kedar shinde: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर सिनेमाची सगळ्यांना उत्सुकता आहे. अंकुश चौधरी सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे.
सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला अनेक दिग्गजांच्या भेटी होणार आहेत. अनेक कलाकारांनी या सिनेमात काम केलं आहे.
महाराष्ट्र शाहीर सिनेमाचं रिलीज तोंडावर आलं असताना केदार शिंदे त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर प्रमोशनसाठी विविध फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आहेत. अशातच त्यांनी एक प्रोमो शेयर करत खास पोस्ट लिहिली आहे.
(kedar shinde shared post about Maharashtra Shaheer promo release date 28 april cast ankush chaudhari)
या प्रोमो मध्ये शाहीर साबळे यांच्या कार्यक्रमातील एक प्रसंग आहे. ज्यामध्ये शाहीर साबळे यांना ''सोंगाड्या विचारतो.. नारदमुनी.. नेता म्हणजे काय.. त्यावर शाहीर म्हणतात.. नेता म्हणजे.. जो जनतेला भूल थापा देता.. सगळ्या जनतेला आपल्या मागून नेता.. आणि सगळी जनता खड्ड्यात गेली जी जो परत येता.. तो नेता..'' असा हा भन्नाट विनोदी आणि प्रहसन करणारा व्हिडिओ आहे.
त्याकाळच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा हा व्हिडिओ आहे. पण हे वास्तव आजच्या ही परिस्थितीला लागू होतं. त्यामुळे हा व्हिडिओ अनेकांना चांगलाच लागणारा आहे. सोबत केदार यांनी एक कॅप्शनही दिलं आहे.
केदार या पोस्ट मध्ये म्हणतात, '' गेले ४ वर्ष मी या सिनेमासाठी काम करतोय. याक्षणी माझी मनस्थिती काय असेल? हे सांगणं कठीण आहे. “महाराष्ट्र शाहीर” हा माझ्यासाठी सिनेमा नाही, एक जबाबदारी आहे. पुढच्या पिढीला शाहीर कळावेत यासाठी अट्टाहास!!''
''नाहीतर उद्या आपल्या पोरांना गोत्र विचारलं तर ते.. Netflix किंवा Amazon सांगायचे. यासाठी एक मदत हवी. प्रोमो पाठवीन ते तुमच्या लोकांना forward करा. Groups ना forward करा. २८ एप्रिल २०२३ महाराष्ट्र शाहीर बघायचा! ही चळवळ उभी करायची आहे...'' अशा शब्दात केदार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.