Kedar Shinde: तर आपण कपाळकरंटे ठरू.. केदार शिंदे यांची सणसणीत पोस्ट..

केदार शिंदे यांनी आपल्या परंपरेवर सडेतोड भाष्य केलं आहे.
Kedar Shinde shared post about our culture and maharashtra shahir movie
Kedar Shinde shared post about our culture and maharashtra shahir moviesakal
Updated on

kedar shinde: मराठी मनोरंजन विश्वात विक्रमी प्रयोग करणारा दिग्दर्शक अशी ख्याती असणारे केदार शिंदे सध्या बरेच चर्चेत आहेत. लवकरच त्यांचे 'बाईपण देगा देवा' आणि 'महाराष्ट्र शाहीर' ही दोन चित्रपट येऊ घातले आहेत. सध्या ते या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. याच निमित्ताने त्यांनी एक सणसणीत पोस्ट लिहिली आहे, जी आपल्या सर्वांनाच खूप काही शिकवून जाते.

(Kedar Shinde shared post about our culture and maharashtra shahir movie)

केदार शिंदे यांचे ''सही रे सही'' असो किंवा ''दामोदर पंत'' असे प्रत्येक नाटक वेगळे ठरले आहे. हाच वेगळेपणा त्यांनी चित्रपटात जपत अक्षरशः धुमाकूळ घातला. जत्रा, अगं बाई अरेच्चा हे चित्रपटही अविस्मरणीय ठरले. आता बऱ्याच काळाने त्यांचे दोन नवे चित्रपट येत आहेत.

एक चित्रपट बाईपणाच वेगळेपण सांगतो तर दूसरा शाहीर साबळे यांची चरित्रगाथा. दोन्ही चित्रपट हे एका अर्थाने संस्कृती आणि परंपरा जपणारे आहेत. किंबहुना त्यांच्या प्रत्येक प्रॉजेक्ट मधून याचे दर्शन घडतेच. म्हणूनच संस्कृती परांपरेवर आज त्यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.

हेही वाचा: जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

Kedar Shinde shared post about our culture and maharashtra shahir movie
Sushant Singh Rajput Birthday: सुशांतची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली, ज्यासाठी त्याने..

या पोस्ट मध्ये केदार म्हंटले आहेत, ''आपण कोण आहोत? याची जाणीव आपली संस्कृती आपल्याला करून देते.. प्रत्येक आपली परंपरा ही,या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जायला हवी. तरच ती टिकेल. म्हणून २८ एप्रिल २०२३ रोजी येणारा #महाराष्ट्रशाहीर चित्रपट पहायला हवा. तरच #मराठी #मराठीसंस्कृती #मराठीभाषा #मराठीसंगीत #मराठीलोकसंगीत #मराठीलोककला #मराठीबाणा टिकेल. नाहीतर पुढच्या पिढीसाठी आपण कपाळकरंटे ठरू. आवडला मुद्दा तर नक्की शेअर करा.'' असे ते म्हणाले आहेत.

शाहीर साबळे यांच्या जीवनावर केदार शिंदे 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट करत आहे. या चित्रपटाची केली वर्षभर बरीच चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळे यांच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे संगीत अजय अतुल करत आहे, शिवाय केदार शिंदे गेली काही दिवस शाहीर साबळे यांचे अनेक किस्से शेयर करत आहेत. त्यामुळे या चित्रपताबाबत चांगलीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.