kedar shinde: दिग्दर्शक केदार शिंदे आणि राज ठाकरे यांची मैत्री अता उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. केदार शिंदे यांचं नाटक असो चित्रपट किंवा वैयक्तिक सुखसोहळे, त्यात एक व्यक्ती असते ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे.
राज ठाकरे यांची आणि केदार शिंदे यांची मैत्री फार जुनी आहे. असं म्हणतात की एकवेळ अशी होती की राज ठाकरे यांच्या सोबत एक फोटों मिळावा म्हणून केदार शिंदे आतुर झाले होते. आणि आज त्यांच्यात सध्या भावांसारखे घनिष्ट संबंध आहे.
आज राज ठाकरे यांचा वाढदिवस. राज ठाकरे कार्यकर्त्यांसमवेत आपला 55 वा वाढदिवस साजरा करत आहेत. याच निमित्ताने केदार शिंदे यांनी आपल्या खास मित्रासाठी एक पोस्ट शेयर केली आहे, विशेष म्हणजे अवघ्या दोन शब्दातच त्यांनी राज ठाकरे म्हणजे नेमकं काय हे सांगितलं आहे.
(Kedar Shinde shared post on MNS chief Raj Thackeray Birthday)
राज ठाकरे म्हणजे कलाप्रेमी माणूस. मराठी मनोरंजन विश्वात कोणीतही अडचण निर्माण झाली की कलाकारांना सर्वात आधी आठवतात ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे. राज ठाकरे यांनी कायमच कलाकारांना राजाश्रय दिला आहे.
आजच नाही तर अगदी दिग्गज कलाकारांशी त्यांचे जिव्हाळ्याचे सबंध आहेत. tyamत्यामुळे मनोरंजन विश्वाचे ते अत्यंत लाडके असे आहेत. त्यामुळे आजच्या वाढदिवशी अनेक कलाकारांनी ही राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पण केदार शिंदे यांनी दिलेल्या शुभेच्छांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
केदार (kedar shinde) यांनी राज ठाकरे यांच्या सोबतचा एक जुना व्हिडिओ शेयर केला आहे. सोबत एक भन्नाट कॅप्शन दिलं आहे. केदार यांनी राज ठाकरे यांना ''राजा माणूस'' असं म्हंटलं आहे. अवघ्या दोन शब्दातच केदार यांनी राज ठाकरेंचं वर्णन केलं आहे.
ही पोस्ट अनेकांना भावली असून,केदार यांच्या चाहत्यांनीही राज ठाकरेंवर शुभेच्छांचा वरस्व केला आहे.
मराठी रंगभूमीवर विक्रमी प्रयोग करणारा दिग्दर्शक म्हणजे केदार शिंदे. त्यांचं 'सही रे सही' असो किंवा 'दामोदर पंत' प्रत्येक नाटक हे भंडावून सोडणारं ठरलं. हाच वेगळेपणा त्यांनी चित्रपटात जपत अक्षरशः धुमाकूळ घातला. 'जत्रा', 'अगं बाई अरेच्चा' असे अविस्मरणीय चित्रपट यांनी दिले.
नुकताच त्यांचा 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट येऊन गेला तर 'बाईपण देगा देवा' हा चित्रपट येऊ घातला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.