अक्षय-शाहरुखचा को-स्टार म्हणून मिरवला,आता चाकू हल्ल्याप्रकरणात मुंबईत अटक

मुंबई पोलिसांनी अटक केलेला केनियन नागरिक जॉन सुजास मेंटीनं अनेक जाहिराती,बॉलीवूड सिनेमातून काम केलं आहे.
Kenyan national arrested for attacking 7 people in SoBo has starred in ad with Akshay Kumar,Shahrukh Khan
Kenyan national arrested for attacking 7 people in SoBo has starred in ad with Akshay Kumar,Shahrukh KhanGoogle
Updated on

मुंबई पोलिसांनी दक्षिण मुंबईत(South Mumbai) सात लोकांवर चाकूनं हल्ला(attack) करणाऱ्या आरोपीला, केनियाचा नागरिक असलेल्या जॉन सुजास मेंटीला ( John Sujas Menti) आज सोमवारी ६ जून रोजी अटक केली आहे. त्याची चौकशी झाल्यावर कळतंय की त्यानं याआधी हिंदी सिनेसृष्टीत काम केलेलं आहे. शिवाय अक्षय कुमार सोबत एका जाहिरातीत स्क्रीन देखील शेअर केलेली आहे. यासंदर्भात पोलिस अटक केलेल्या आरोपीची अधिक चौकशी करीत आहेत.(Police Arrested John Sujas Menti Who Attacked seven people in south Mumbai)

Kenyan national arrested for attacking 7 people in SoBo has starred in ad with Akshay Kumar,Shahrukh Khan
Photo: सोनालीचा 'खण'खणीत लूक, खणाची पॅन्ट अन् क्रॉप टॉप

पोलिस या प्रकरणात हे जाणून घ्यायचा प्रयत्न करीत आहेत की जॉन मेंटींने बॉम्बे हायकोर्टाजवळ(Bombay Highcourt) लोकांवर चाकून हल्ला केला तेव्हा तो नेमका रागात का होता? तपास अधिकाऱ्यांना आरोपीनं जाहिरातीत काम केलंय हे तेव्हा कळलं जेव्हा त्यांनी त्याच्यासमोर अक्षय कुमारसोबत(Akshay Kumar) काम केलेल्या त्या मोबाईलच्या हॅन्ड सेटचं नाव घेतलं.

Kenyan national arrested for attacking 7 people in SoBo has starred in ad with Akshay Kumar,Shahrukh Khan
सलमानच्या 'गॅलेक्सी' अपार्टमेंटमध्ये पोहोचले पोलिस,सुरक्षेत अचानक वाढ...

आझाद मैदान पोलिस स्टेशनमधील एका अधिकाऱ्यानं फ्री प्रेस जर्नलसोबत या प्रकरणा संदर्भात खुलासा करताना सांगितलं की,''आम्हाला You Tube वर जाहिरातीचा संदर्भ सापडला. आम्ही जेव्हा ती जाहिरात पूर्ण पाहिली तेव्हा आम्ही त्या जाहिरातीत मेंटीला पाहिलं. पण निष्कर्षाला पोहोचताना आम्ही अटक केलेला मेंटी आणि अक्षयच्या मोबाईल जाहिरातीतील तो माणूस एकच आहे हे कळेपर्यंत खूप वेळ गेला. मेंटीनं पोलिसांच्या समोर हा देखील खुलासा केला आहे की फराह खानच्या 'हॅप्पी न्यू ईयर' सिनेमात त्यानं काम केलं होतं.,पण अद्याप यासंदर्भात पोलिसांची चौकशी पूर्ण झालेली नाही.

Kenyan national arrested for attacking 7 people in SoBo has starred in ad with Akshay Kumar,Shahrukh Khan
अंतर्वस्त्राविषयी सई ताम्हणकरचा मोठा खुलासा; म्हणाली,'मला आवडत नाही...'

मेंटी संदर्भात अधिक माहिती गोळा करताना कळले आहे की तो २००४ मध्ये अभ्यास करण्याच्या हेतूनं भारतात आला होता. सध्या पोलिसांना मेंटी विषयी खरी आणि अधिक माहिती जमा करण्यात अडचणी येत आहेत. कारण जेव्हा-जेव्हा त्याच्याशी चौकशी केली जातेय तेव्हा-तेव्हा तो वेगवेगळी उत्तरं देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.