The Kerala Story: विपुल शाह निर्मित आणि सुदिप्तो सेनद्वारा दिग्दर्शित 'द केरला स्टोरी' या चित्रपटात अदा शर्मा ही मुख्य भुमिका साकारत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाल्यापासूनच बराच वाद सुरु झाला आहे. त्यात मुलींच्या संख्येवरुनही बरेच राजकारण झाले.
'द केरला स्टोरी'च्या ट्रेलरने इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घातला आहे. आता हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे.
पहिल्याच दिवशी याचित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं बोलल जात आहे. मात्र या चित्रपटाबाबत निर्माण झालेला गोंधळ अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही आहे.
या मुद्यावरुन बरचं राजकारण तापलेलं असतांनाच शशी थरुर यांनी मुलींचे आकडे सिद्ध करुन दाखवणाऱ्याला एक कोटींच बक्षीस देखील जाहिर केलं होते.
इतकच नाही तर या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही अनेक राजकीय पक्षांनी केली. तर पण सुप्रीम कोर्टाने यास नकार देत याचिका कर्त्यांना फटकारलंही आहे.
आता त्यातच केरळचे विद्यमान राज्यपाल आणि माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान यांचे ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून मोठे वक्तव्य समोर आले आहे.
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले की, राज्यातील कोणत्याही 'लव्ह जिहाद'च्या घटनां विरोधात पावले उचलणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.
मी हा चित्रपट पाहिला नाही, शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी याकडे लक्ष द्यावे.
केरळमध्ये लव्ह जिहादच्या घटना घडत असतील तर त्याविरोधात कठोर कारवाई करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्याचबरोबर त्यांनी ‘द केरळ स्टोरी’ हा प्रोपगंडा चित्रपट आहे या आरोपांवर भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला.'
हा चित्रपट राज्यातील हिंदू महिलांचे जबरदस्तीने धर्मांतर करून त्यांना दहशतवादाकडे ढकलण्याच्या सत्य घटनांवर आधारित आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये "केरळमधील 32,000 महिलांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या कथा दाखवल्या आहेत असं सुरवातीला सांगण्यात आलं होते. यानंतर मुलींच्या संख्येवरुन बराच वाद झाला होता.
त्यानंतर, चित्रपटाच्या टीझरचं वर्णन बदलून "केरळमधील तीन तरुणींच्या सत्य कथा" असे करण्यात आले.
विपुल शाह निर्मित आणि सुदिप्तो सेनद्वारा दिग्दर्शित हा चित्रपट एका दहशतवादी संघटनेने केलेल्या महिलांच्या तस्करीची हृदयद्रावक आणि धक्कादायक कथा समोर आणतो. ज्यात अदा शर्मा मुख्य भुमिकेत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.