Ketaki Chitale on Maratha Reservation: केतकी चितळे ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री. तुझं माझं ब्रेकअप या मराठी मालिकेतुन केतकी चितळे प्रसिद्धीझोतात आली. केतकी चितळे सतत समाजमाध्यमांवर विविध राजकीय, सामाजिक विषयांवर पोस्ट करत असते.
केतकीने काहीच तासांपुर्वी मराठा समाजाच्या आरक्षणावर पोस्ट केलीय. या पोस्टची सध्या जोरात चर्चा सुरु आहे.
(Ketaki Chitale condemned attack on public transport buses for demand of reservation by Maratha Community)
केतकी चितळेच्या पोस्टची चर्चा
केतकी चितळेने सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. यात तिने मराठा समाजाच्या आंदोलकांनी फोडलेल्या एस.टी. बसचा फोटो पोस्ट केलाय.
हा फोटो पोस्ट करुन केतकी लिहीते, एस टी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा??!
इंडियाला Uniform Civil Code (UCC) हवा असेल, पण भारताला #UniformCivilLaw तसेच #UniformCriminalLaw ची गरज आहे.
सामान्य माणसाला त्रास देऊन काय होणार?
केतकी चितळेने पुढे लिहीलंय की, "सरकारकडे मागणी करा, सामान्य माणसाला त्रास देऊन काय होणार? आणि एस टी विभाग किंवा चालक कसे देणार आरक्षण.
चुकुन तो दगड चालकाला लागला असता तर? ।।जय हिंद।। ।।वंदेमातरम्।। ।। भारत माता की जय।।" अशाप्रकारे केतकी चितळेने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनावर पोस्ट केलीय. या पोस्टचं काहींनी समर्थन केलंय तर काहींनी केतकीच्या पोस्टवर टिका केलीय.
हेमंत ढोमेने केलेली मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर पोस्ट
दिग्दर्शक हेमंत ढोमे याने सोशल मिडियावर पोस्ट करत या प्रकरणावर भाष्य केले आहे. हेमंत आपल्या पोस्टमध्ये लिहितो की, "आजवर शांततेने, अहिंसेने चाललेले मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक वळण घेतंय…मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय… त्यांच्या न्याय मागणीचा विचार झाला पाहिजे! सरकारने लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत शिवरायांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र अशांत होता कामा नये! जय शिवराय!".
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.