Ketaki Chitale News: मराठी अभिनेत्री केतकी चितळे मनोरंजन विश्वात इतकी सक्रीय नसली तरी तिच्या वक्तव्यांमुळे ती चर्चेत असते. केतकी चितळे काही म्हणाली आणि वाद झाला नाही असं होणं कठीण आहे.
केतकी सतत काही ना काही वक्तव्य करत कायम नवनवीन वाद ओढवुन घेते. काल म्हणजेच १७ जुलैला दीप अमावस्या होती. त्यानिमित्ताने केतकीने लिहीलेली पोस्ट चर्चेत आहे.
(ketaki chitale marathi actress special post on aashadh deep amavasya 2023 )
केतकी चितळेने ३ फोटो शेअर केलेत. या फोटोंमध्ये केतकी चितळेने घरात दाखवलेल्या दीप अमावस्येचे फोटो शेअर केलेत. यात केतकीच्या घरी पुजा झालेली दिसतेय.
तर बाकीच्या फोटोंंमध्ये केतकी पीठाचे दिवे खाताना दिसतेय. हे फोटो पोस्ट करुन केतकीने एक पोस्ट लिहीलीय. ती व्हायरल झालीय.
केतकी लिहीते... ३ दात काढले आहेत. बोलता येत नाहीये, नीट काही खाता येत नाहीये, मळमळ, वर्टीगो, सर्व चालू आहे त्या एंटिबायोटिक्स मुळे. इलाज नाही कारण एपिलेप्सी औषधे व ही औषधे एकमेकांबरोबर क्लॅश होतात!
पण,आज दीप पूजन म्हंटल्यावर दिवे तर झालेच पाहिजेत. आगाऊपणा बघा, तोंड उघडता येत नसले तरी दिवे खायचे नाही, असे कसे!! तुम्हा व तुमच्या परिवारास दिव्याच्या अवसेच्या शुभेच्छा. अशी पोस्ट लिहीत केतकीने दीप अमावस्येच्या शुभेच्छा दिल्यात.
केतकी स्वतःच्या आयुष्यावर लिहीणार पुस्तक
काही दिवसांपुर्वी केतकीनं इन्स्टाग्राम लाईव्ह केलं होत. यामध्ये मतदान ओळखपत्रासाठी नोंदणी करा, मतदान करा. युसीसीबाबत तुमचं मत मांडा.
एपिलेप्सी कम्युनिटीमध्ये असलेला आकाश दीक्षित हा कशाप्रकारे फसवणूक करत आहे, असे अनेक मुद्दे केतकीने इन्स्टाग्रामवर लाईव्हवर मांडले.
याच वेळी तिनं एका चाहत्याला उत्तर देताना मोठा खुलासा केला. केतकी म्हणाली कि पुढच्या वर्षी माझ्या आयुष्यावर आधारित पुस्तक प्रकाशित होणार असल्याचं तिने सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.