Ketaki Chitale Post : 'नार्वेकर बाप ही दाखवतायत आणि श्राद्ध ही करतायत'! केतकी बोललीच

राज्यातील राज्यकारण हे सध्या वेगळ्याच दिशेला जात असल्याचे दिसून आले आहे.
Ketaki Chitale Marathi Celebrity reaction on Rahul Narvekar
Ketaki Chitale Marathi Celebrity reaction on Rahul Narvekar
Updated on

Ketaki Chitale Marathi Celebrity reaction on Rahul Narvekar Press : राज्यातील राज्यकारण हे सध्या वेगळ्याच दिशेला जात असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना कुणाची हा प्रश्न ऐरणीवर होता. त्याचा निकाल नुकताच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्यात त्यांनी बंडखोर आमदार आणि दुसऱ्या गटाचे आमदार यांना पात्र ठरवले होते.

राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या निकालावर उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray ) आणि स्वत: उद्धव ठाकरे हे नाराज असल्याचे दिसून आले. आज उद्धव यांनी महापत्रकार परिषदेचे आयोजन करुन नार्वेकर यांचा निर्णय हा कसा चूकीचा होता हे वेगवेगळ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला. यात कायदेतज्ञ यांचीही मदत घेण्यात आली. त्या पत्रकार परिषदेची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. (uddhav thackeray press)

या सगळ्यात मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी केतकी चितळेनं (Ketaki Chitale) फेसबूकवर पोस्ट केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केतकी चर्चेत आली आहे. तिच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. केतकी ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. तिच्या यापूर्वीच्या अनेक वक्तव्यांवरुन वाद झाल्याचे दिसून आले आहे. ketaki facebook post

आताही केतकीनं फेसबूकवर जी पोस्ट केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या त्या पत्रकार परिषदेनंतर राहुल नार्वेकर यांनी देखील प्रेस कॉन्फरन्स घेत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. त्यावर केतकीनं फेसबूकवर पोस्ट केली आहे.

Ketaki Chitale Marathi Celebrity reaction on Rahul Narvekar
Uddhav Thackeray: शिंदे, नार्वेकरांनी विना सुरक्षा यावं, मग कळेल शिवसेना कुणाची; उद्धव ठाकरेंचा इशारा

आपल्या त्या पोस्टमध्ये केतकीनं एका वाक्यात आपलं म्हणणं मांडलं आहे. ती म्हणते, नार्वेकर बाप ही दाखवतायत आणि श्राद्ध ही करतायत. अशा शब्दांत केतकीनं तिच्या भावना व्यक्त केल्या असून त्यावर तिला नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यातील लढत अद्याप संपलेली नाही. पक्षाच्या अधिकाराबाबत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या अधिकाराबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय चुकीचा मानला आणि शिवसेनेवर त्यांचाच खरा दावा असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.