Ketaki Chitale: सत्य सांगून माझा खून होणार असेल तर.. केतकीच्या पोस्टनं उडवली खळबळ..

वादग्रस्त विधानाने चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेची पोस्ट चर्चेत..
Ketaki Chitale shared post about truth and death and said keep speaking the truth even though i am still fighting for self justice
Ketaki Chitale shared post about truth and death and said keep speaking the truth even though i am still fighting for self justicesakal
Updated on

Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळे अभिनयापेक्षा कायम आक्षेपार्ह पोस्टमुळे सतत चर्चेत असते. तरीही तिचा सोशल मीडियावरचा वावर सगळ्यांच लक्ष वेधून घेतो. पण सध्या तिची पोस्ट वेगळ्याच कारणासाठी व्हायरल होत आहे.

केतकी कायमच अशा पोस्ट करते ज्यामुळे ती चर्चेचा विषय ठरते. मध्यंतरी तिला शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह विधानावरून अटक देखील करण्यात आली होती. केतकी बऱ्याचदा भाजप पक्षाला पाठिंबा देताना दिसली आहे.

तिच्या मते, ती सत्य बोलते म्हणून तिला ट्रोल केलं जातं. पण यासाठी तिचा खून झाला तरी चालेल असे खळबळजनक विधान तिने केले आहे. तिची ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे.

(Ketaki Chitale shared post about truth and death and said keep speaking the truth even though i am still fighting for self justice)

Ketaki Chitale shared post about truth and death and said keep speaking the truth even though i am still fighting for self justice
Sharad Ponkshe: सावरकरांचे विचारच देशाला तारू शकतात.. 'त्या' घटनेवर अखेर शरद पोंक्षे बोललेच..

या पोस्टमध्ये केतकीने स्वतःच्या फोटो सोबत एक मजकूर लिहिला आहे. ज्यामध्ये ती म्हणते, 'मी आजही न्यायासाठी लढत असले तरी मी कायम सत्यच बोलत राहीन. मी जामिनावर बाहेर असले तरी तुम्ही नवीन काही कट रचून माझ्यावर नवीन केसेस लावू शकता (म्हणजे त्यात नवीन काय आहे, तुम्ही गेली 7 वर्षे तेच करत आहात). तुम्ही माझ्याबद्दल खोट्या बातम्या तयार करू शकता. पण मी थांबणार नाही. गप्प राहून मारण्यापेक्षा सत्य बोलून माझा खून झाला तरी चालेल' अशी पोस्ट केतकीने केली आहे.

पुढे केतकी कॅप्श न मध्ये म्हणाली आहे, 'सत्य धोकादायक असल्याने अनेकांना ते ऐकायला किंवा वाचायला आवडत नाही. सत्य आणि खोटेपणा लपवण्यासाठी ते एखाद्याचा जीवही घ्यायला मागेपुढे बघत नाहीत.
एखाद्या अपघातात किंवा संशयास्पदरित्या माझ्या मृत्यू झाला, किंवा माझ्या निधनाचं कारण प्रमाणाबाहेर औषधे अथवा गळफास घेतल्याचं असेल तर माझा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या केल्याने झालेला नसेल.
मी आत्महत्येसारख्या प्रसंगाला लढा दिलेली मुलगी आहे. त्यामुळे मी पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यामुळे यावेळी आत्महत्या केल्याने माझा मृत्यू होणार नाही.
त्यामुळे माझ्या मृत्यूची बातमी आली तर यामागील सत्य तुम्हाला ठाऊक असेल.
जय हिंद! वंदे मातरम्! भारत माता की जय!'

केतकीच्या या पोस्टचा नेमका अर्थ काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. तिच्या या पोस्टने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.