Yash On Bollywood: 'टॉलीवूडचा नाद करु नका'! KGF चा यश बोललाच! 'तुम्ही कितीही...'

केजीएफ चित्रपटाविषयी कुणी ऐकलं नाही असं एखादा म्हटला तर आश्चर्य वाटेल.
Yash KGF
Yash KGFesakal
Updated on

KFG Fame Actor Yash comment on bollywood: केजीएफ चित्रपटाविषयी कुणी ऐकलं नाही असं एखादा म्हटला तर आश्चर्य वाटेल. यंदाच्या वर्षी या चित्रपटाची मोठी क्रेझ राहिली. बॉक्स ऑफिसववर केजीएफनं केलेली कमाईही विक्रमी होती. आता त्याचा मुख्य अभिनेता यशनं एका मुलाखतीतून बॉलीवूडविषयी परखडपणे मतं व्यक्त केली आहे.

एका मुलाखतीमध्ये बोलताना यशनं आक्रमक आणि तितक्याच परखडपणे आपली भूमिका मांडली आहे. तो म्हणाला, टॉलीवूडचे यश नाकारता येणार नाही. त्यांनी गेल्या वर्षभरापासून बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांपेक्षा मोठी कमाई केली आहे. केजीएफला देशभरातील सगळ्याच प्रेक्षकांचा मोठा सपोर्ट मिळाल्याचे दिसून आले होते. आता त्यात कोणताही भेदभाव नव्हता. कदाचित भाषिक अडचणी आल्या असतीलही पण त्यावरुन मनोरंजनात कोणतीही कमतरता आलेली नाही.

Also Read - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

एवढचं बोलून यश काही थांबला नाही. तो म्हणाला खरं तर कुणीही बॉलीवूड, टॉलीवूड अशी तुलना करु नये. त्यांचा बाज वेगळा आहे. कथा, त्यांचे संदर्भ वेगळे आहेत. टॉलीवूडनं मोठी कमाई केली आहे हे काही नाकारता येणार नाही. मात्र आपण जर नेहमीच बॉलीवूड-टॉलीवूड अशी तुलना करत बसलो तर त्याचा परिणाम दोन्ही चित्रपट विश्वावर होतो हेही लक्षात घेण्याची गरज आहे. मला यासगळ्यात युवा पिढीला एक गोष्ट सांगायची आहे की, त्यांनी आपआपसात या गोष्टीवरुन भांडू नये. शेवटी चित्रपटांचे मनोरंजन महत्वाचे आहे.

बॉलीवूडला भविष्यात तितक्याच गांभीर्यानं घ्यावं लागेल. लोकांनी त्यांची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. याचा अर्थ त्यांनीच काही योग्य केले नाही असे नाही. प्रेक्षकांनी संयम ठेवून सगळ्यांप्रती योग्य तो आदरही ठेवावा. एक खरं आहे की आम्ही याजागी येण्यासाठी केलेला संघर्ष खूप मोठा आहे. असंही यशनं म्हटलं आहे.

वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाल्यास केजीएफचा पहिला भाग २०१८ मध्ये आला होता. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटानं मोठ्या प्रमाणावर यश मिळवले होते. त्यावेळी केजीएफची हवा एवढी होती की, बॉलीवूडचा कोणताही चित्रपट केजीएफ समोर टिकला नाही. त्यानंतर आलेल्या केजीएफच्या २ पार्टनं तर बॉलीवूडचे कंबरडेच मोडून टाकले. त्यामध्ये यश, श्रीनिधी, रवीना टंडन, संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.