संजुबाबानं सांगितली KGF 2 च्या क्लायमॅक्सची गोष्ट, 'कॅन्सरमधून...'

टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता यशचा केजीएफ 2 (KGF 2) हा उद्या देशभर सगळीकडे प्रदर्शित होणार आहे.
Sanjay Dutt
Sanjay Duttesakal
Updated on

Tollywood News: टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता यशचा केजीएफ 2 (KGF 2) हा उद्या देशभर सगळीकडे प्रदर्शित होणार आहे. यानिमित्तानं सध्या वेगवेगळ्या ठिकाणी केजीएफची (Bollywood Movies) टीम प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. काल एका ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये यशला यायला उशीर झाल्यानं काही पत्रकारांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली होती. केजीएफमध्ये यशसोबत संजय दत्त, रविना टंडन (Raveena Tondon) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. केजीएफ 2 तसेच संजय दत्तचे (Sanjay Dutt) पात्र अधिरा याची सध्या खूप चर्चा आहे, कारण या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान कोविड भारतात मोठ्या प्रमाणात पसरला होता आणि त्याचवेळी (Entertainment News) अभिनेता संजय दत्तच्या कर्करोगाची (Cancer News) माहिती मिळाली होती.

कर्करोगातून बरे झाल्यानंतर संजयने प्रथम केजीएफ 2 चे शूटिंग सुरू केले आणि तेही त्याच्या क्लायमॅक्सच्या सीनने. अशा परिस्थितीत हे करणे किती कठीण होते, यावर खुद्द संजयनेच आता प्रकाश टाकला आहे. संजय म्हणतो की "होय, हे केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या कुटुंबासाठीही आव्हानात्मक होते. माझ्यावर उपचार सुरू होते, केमोचे सत्र सुरू होते आणि जेव्हा मी क्लायमॅक्सचे शूटिंग सुरू केले तेव्हा देखील ते सुरूच होते. त्यातून सुटका नव्हती. तुम्हाला ते करावेच लागते जे तुम्हाला करायचे आहे. मात्र जेव्हा तुमच्या जीवनात रॉक-सॉलिड सपोर्ट सिस्टीम असेल तेव्हा ते करणे सोपे होते. माझ्या कुटुंबाची ताकद आणि उत्कटतेच्या जबाबदारीने मला अभिनयात परत आणण्यासाठी मला मानसिकदृष्ट्या धैर्यवान आणि उत्साही ठेवले. मी 'कधीही हार मानू नका' या ब्रीदवाक्यासोबत वाढलो आहे. देव दयाळू आहे, आज मी कर्करोगमुक्त आहे आणि नॉर्मल आयुष्य जगतो आहे.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजयच्या तब्येतीला लक्षात घेऊन चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि मेकर्सनी संजय दत्तला बॉडी डबलची मदत घेण्याचा सल्ला दिला, पण संजयने बॉडी डबलशिवाय संपूर्ण सीन स्वत: शूट केला. याविषयी संजय दत्त म्हणतो, "त्यांनी ग्रीन पडद्यावर चित्रीकरण करावं असं सुचवलं होतं. पण एक अभिनेता म्हणून या चित्रपटाचं अचूक शूटिंग करणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं." अशा प्रकारे अभिनेत्याने संपूर्ण टीमला हाई एनर्जी सीन्स शूटिंगपासून वाचवले. केमोथेरपीनंतर इतक्या अडचणींचा सामना केल्यावर शरीर इतकं अशक्त होतं तरीही, संजय दत्त पुन्हा आपल्या फॉर्ममध्ये आला आणि संपूर्ण सीन स्वतः शूट केला. त्यामुळे या अपार परिश्रमाने आपण निश्चितपणे म्हणू शकतो की केजीएफ 2 साठी दत्त हाच खरा तारणहार आहे.

Sanjay Dutt
Video Viral: चिंपाझी झाला 'पुष्पाचा' फॅन, 'श्रीवल्ली'वर केला डान्स

संजय दत्तकडे अनेक अडचणींचा सामना करून देखील अफाट दृढता आणि सहनशीलता आहे. अभिनेत्याने "मैं आ रहा हूँ अपनी केजीएफ लेने" हे कोणत्या परिस्थिती म्हटले हे सर्वात महत्त्वाचे आहे. दर्शक या चित्रपटाबद्दल खूपच उत्सुक आहेत.

Sanjay Dutt
Video : वरुण धवनचा Comfy Airport लूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.