KGF स्टार यशचा दानशूरपणा, 3 हजार कर्मचाऱ्यांना मदतीचा हात

कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून मनोरंजन क्षेत्राची अवस्था दयनीय झाली आहे.
yash actor
yash actor Team esakal
Updated on

मुंबई - केजीएफच्या (kgf 2) पहिल्या भागाला प्रचंड यश मिळाले होते. बॉक्स ऑफिसवर (box office) त्यानं मोठी कमाई केली होती. गेल्या दोन वर्षांपासून चाहते त्याच्या दुस-या भागाची प्रतिक्षा करत आहेत. मात्र निर्मात्यांना अजून केजीएफच्या दुस-या भागाच्या प्रदर्शनासाठी तारीख भेटलेली नाही. आतापर्यत दोनवेळा या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे अनेक चित्रपटांना प्रदर्शनासाठी झगडावे लागत आहे. केजीएफमधील प्रमुख अभिनेता यशनं (yash) आता साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील तीन हजार कर्मचा-यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. (kgf chapter 2 superstar yash announces to donate 1 point 5 crores to 3000 kannada film workers)

यश (yash) कन्नड (kannad) चित्रपटसृष्टीतील तीन हजार (3 thousand) कर्मचा-यांच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये जमा करणार असल्याची माहिती यशनं सोशल मीडियातून दिली आहे. त्याच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतूक होताना दिसत आहे. यश हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारा अभिनेता आहे. केवळ साऊथमध्येच नाहीतर बॉलीवूडमध्येही त्याचा चाहतावर्ग मोठा आहे.

कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून मनोरंजन (entertainment field) क्षेत्राची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक सेलिब्रेटींना आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागत असल्याचेही दिसून आले आहे. अशा परिस्थितीत अनेक कलाकारांनी सोशल मीडियाचा आधार घेऊन आपल्या सद्यस्थितीविषयी चाहत्यांना सांगितले आहे. त्यात अधिक भरणा टेलिव्हिजन क्षेत्रातील कलाकारांचा आहे.

yash actor
'माझा होशील ना'च्या सेटवर आमरस पार्टी
yash actor
श्रेया घोषालनंतर आता 'या' गायिकेच्या घरी होतंय नव्या पाहुण्याचं स्वागत

यशनं आपल्या सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती दयनीय आहे. अशावेळी आपल्याला एकमेकांना मदत करायला हवी. त्या भावनेतून मी पुढाकार घेतला आहे. त्याच्या या दानशूर स्वभावाचे सगळ्या स्तरांतून कौतूक होताना दिसत आहे. अनेकांनी त्याला त्याच्या या उपक्रमाबद्दल धन्यवादही दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.