KKK 13 Contestant: 'खतरों के खिलाडी' हा शो भारतातील स्टंट बेस्ड शो पैकी एक मोठा शो आहे. या शो चा १३ वा सीझन लवकरच सुरू होत आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करत असलेल्या या शो चा मोठा चाहतावर्ग आहे. आणि हा शो पाहायला आता ते सगळेच खूप उत्सूक आहेत. यावेळी शो मध्ये नवीन काय पहायला मिळणार हे सगळ्यांनाच जाणून घ्यायचं आहे.
मनोरंजन सृष्टीतले ओळखीचे चेहरे यावेळी सीझन १३ मध्ये भाग घेणार आहेत. 'जय हो' आणि 'रेस ३' सिनेमातून दिसलेली डेझी शाह ही त्यापैकीच एक. बोललं जात आहे की डेझीला सर्वाधिक मानधन यावेळी दिलं गेलं आहे.(Khatron Ke khiladi 13 shiv thakare daisy shah who is highest paid conestant)
इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार,डेझी शाहनं मानधनाच्या बाबतीत शिव ठाकरेला मागे टाकलं आहे,तिला म्हणे शिवपेक्षा दुप्पट मानधन मिळालं आहे. अभिनेत्रीला प्रत्येक एपिसोडचे १५ लाख रुपये मानधन मिळालं आहे.
तर आतापर्यंत ज्या शिवला सर्वाधिक मानधन मिळाल्याची चर्चा रंगली होती त्याला फक्त ६ लाख रुपये मानधन मिळाल्याचं कळत आहे. याव्यतिरिक्त रिपोर्टमध्ये रोहित रॉयला सात लाख तर नायरा बॅनर्जीला सहा लाख रुपये मानधन दिलं गेलं आहे.
डेझी शाहनं एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 'खतरों के खिलाडी' सीझन १३ मध्ये सामिल होण्यासंदर्भात म्हटलं होतं की, ''मी थोडी नर्व्हस आहे पण उत्सुक देखील आहे..मी सध्या शो ला जाण्याच्या तयारीत व्यस्त आहे..कारण शो मध्ये शेवटी शेवटी मी सामिल झाले,त्यामुळे माझी खूपच घाई होत आहे. शूटिंगसाठी रवाना व्हायला काहीच दिवस राहिलेयत आणि माझ्याकडे तयारी करायला खूपच कमी वेळ आहे''.
डेझी पुढे म्हणाली होती,''शो मध्ये येणाऱ्या आव्हांनाचा सामना करायला मी स्वतःला मानसिक रित्या सक्षम बनवत आहे. पण सध्या त्यासाठी खूपच कमी वेळ माझ्याकडे आहे,पण आतापर्यंत मी फिटनेससाठी ज्या काही गोष्टी शिकलेय त्याची मला नक्कीच मदत होईल''.
तसंच अभिनेत्री म्हणाली होती की,''तिला किड्यांची खूपच भीती वाटते पण केपटाऊनमध्ये काय होणार आहे याविषयी आता मी काहीच सांगू शकत नाही''.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.