Khatron ke khiladi: बिग बॉस तर हुकला मात्र खतरों के खिलाडी जिंकणार! शिव ठाकरेचा KKK13 प्रवास सुरु

Khatron ke khiladi
Khatron ke khiladiEsakal
Updated on

Khatron Ke Khiladi 13:  सर्वात आवडता आणि तितकाच रोमांचक शो 'खतरों के खिलाडी'चा 13 वा सिझनचा 15 जुलै 2023 पासून शुभारंभ झाला आहे. या वेळी शोमध्ये सगळ्याच स्पर्धकांनी खुप उत्सूकतेने या शोमध्ये भाग घेतला.

या सिझनमध्ये एकूण 13 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. यामध्ये ऐश्वर्या शर्मा, शिव ठाकरे, अर्चना गौतम, शीजन खान, रोहित रॉय, अंजली आनंद, रुही चतुर्वेदी, अंजुम फकीह, अरिजित तनेजा, सौंदस मौफकीर, नायरा बॅनर्जी, डेझी शाह, दिनो जेम्स, रश्मीत कौर या स्पर्धकांच्या नावांचा समावेश आहे. मागच्या सिझनमधील स्पर्धक दिव्यांका त्रिपाठी, हिना खान आणि मिस्टर फैजू देखील दिसणार आहे. खतरों के खिलाडी सीझन 13 आता प्रसारित झाला आहे आणि प्रत्येकजण आपल्या लाडक्या स्पर्धकाला पाठिंबा देत आहे.

Khatron ke khiladi
Hollywood Strike RRR: हॉलीवुडच्या आंदोलनात RRR चं पोस्टर झळकलं, सिनेमाची अशीही हवा

मात्र हा शो सुरु झाल्यापासून एक स्पर्धक खुप चर्चेत आहे. तो म्हणजे मराठमोळी स्पर्धक शिव ठाकरे. रॉडीज असो, बिग बॉस मराठी असो किंवा बिग बॉस सीझन 16 असो शिव नेहमीच गाजला.

आता त्यातच त्याने खतरों के खिलाडी सीझन 13मध्ये भाग घेतला आणि तो सर्व टाक्सही यशस्वीरित्या पुर्ण करेल असा विश्वास त्याच्या प्रेक्षकांना आहे.

शिव ठाकरे खतरों के खिलाडी सीझन 13 मधील सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहे आणि म्हणूनच त्याने पहिल्या दिवसापासून शोमध्ये वेगळ स्थान निर्माण केलं आहे. त्याने 'खतरों के खिलाडी'मधला पहिला टास्कही जिंकला आणि प्रसिद्धी मिळवली.

Khatron ke khiladi
The Battle Story of Somnath : सोमनाथ मंदिरावरील हल्ला, महंमद गझनीच्या कृष्णकृत्याची कहाणी सांगणारा चित्रपट

खतरों के खिलाडीच्या पहिल्याच टास्कमध्ये शिवने आपल्या अॅक्शन मोडमध्ये आला आहे. तो हा शो जिंकण्यासाठी आला असल्याचं त्याने सांगतिलं.

त्याच्या पहिल्या टास्कबद्दल बोलताना शिवने खुलासा केला की, "हे हेलिकॉप्टर टास्क होते, जिथे आम्ही चौदा स्पर्धक हेलिकॉप्टरला बांधलेल्या जाळ्यावर लटकत होतो. ज्याचा हाथ सुटला तो टास्कमधून आउट. मी आणि इतर दोन सहकारी स्पर्धकांसोबत टास्क पूर्ण करण्यात यशस्वी झालो आणि स्वत:ला टॉप ३ मध्ये आलो"

Khatron ke khiladi
Kajol Kiss: 29 वर्षांनंतर मोडला काजोलनं नो-किसिंग पॉलिसी रेकॉर्ड!

शिवने सांगतिले की पहिल्या टाक्सनंतर त्याला हे कळालं की धोक्यानं भरलेला हा प्रवास सोपा नाही. त्यामुळे त्याने हा शो सुरवातीपासूनच मेहनतीने जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.

खतरों के खिलाडी 13 बद्दल सांगायचं झालं तर, हा शो नेहमीप्रमाणे कलर्स टीव्हीवर प्रसारित होईल. दर शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता हा शो प्रेक्षक पाहू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.