Khesari Lal Yadav bought New Luxury Car land rover defender : कधीकाळी प्रचंड हलाखीत आणि कष्टात आयुष्य व्यतीत केलेल्या सेलिब्रेटींविषयी त्यांच्या चाहत्यांना जाणून घेण्यात नेहमीच रस असतो. बॉलीवूड, टॉलीवूडमध्ये अशा सेलिब्रेटींची काही कमी नाही. जीवघेणं संघर्ष करुन आपल्या नावाची वेगळी ओळख तयार केलेल्यांची संख्या मोठी आहे.
ज्यांना भोजपूरी सिनेमाची आवड असेल त्यांना खेसारी लाल यादव कोण हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. तो सध्या त्या चित्रपट सृष्टीतील मोठा सेलिब्रेटी आहे. सध्या खेसारी हा वेगवेगळ्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत राहणारा स्टार अभिनेता झाला आहे. त्याला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशा खेसारीच्या जीवनप्रवासाविषयी आपण जाणून घेणार आहोत.
Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ
२०१३ मध्ये खेसारीनं त्याच्या करिअरला सुरुवात केली. बघता बघता तो मोठा स्टार अभिनेता झाला. आज तो भोजपूरी चित्रपट विश्वामध्ये सर्वाधिक कमाई करणारा आणि मानधन घेणारा अभिनेता आहे. प्रसिद्ध अभिनेता रवि किशन नंतर प्रचंड लोकप्रियता मिळवणाऱ्या अभिनेत्यांममध्ये खेसारीचे नाव घ्यावे लागेल. साजन चले ससूराल या चित्रपटापासून त्यानं सुरुवात केली होती. त्यानंतर तो सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिला आहे.
संगीत विश्वामध्ये देखील खेसारीच्या म्युझिक व्हिडिओला मिळणारी पसंती सर्वाधिक आहे. आज खेसारीकडे करोडो रुपये किंमतीच्या अलिशान कार्स आहेत. फार कमी भोजपूरी सेलिब्रेटींकडे अशा महागड्या कार आहेत. त्यात खेसारीच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. त्यानं लँड रोव्हर डिफेंडरची खरेदी केली आहे. त्याची सुरुवात एख कोटींपासून सुरु होते. सध्या खेसारीच्या नव्या कारचा फोटो इंस्टावरुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
खेसारीनं त्या नव्या कारची पूजा करतानाचा तो व्हिडिओ पोस्ट केला असून त्याला दिलेली कॅप्शन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या कॅप्शनमध्ये खेसारी लिहितो की, माझ्या चाहत्यांच्या प्रेमाशिवाय हे सगळं शक्य नाही. त्यांनी आजवर जे प्रेम दिले त्यामुळे मला काही होता आले. त्यांच्या प्रेमासाठी मला त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. खेसारीच्या त्या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
असं म्हटलं जातं की, आता मोठ्या अलिशान लाईफचा आनंद घेणाऱ्या खेसारीला मोठ्या गरीबीचा सामना करावा लागला आहे. त्यानं कधीकाळी सासूरवाडीकडून म्हशी घेऊन जो दूधाचा व्यवसाय सुरु केला त्यातून कमाई केली. तो व्यवसाय भरभराटीला आणला. लग्न करण्यासाठी देखील त्याच्याकडे पैसे नव्हते. अशा खेसारीच्या संघर्षाचे नेटकरी कौतूक करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.