किच्चा सुदीपचा(Kiccha Sudeep) 'विक्रांत रोना' सिनेमाचा ट्रेलर जुन मध्ये रिलीज केला गेला. ट्रेलरमध्ये सिनेमातील व्हिज्युअल पाहिल्यानंतर पाहणारे 'आ' वासून पाहत राहिले होते. आणि सिनेमा कमाल दाखवणार अशा प्रतिक्रियाही उमटू लागल्या होत्या. ट्रेलर रिलीज होण्याआधीपासून सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेला किच्चा सुदीप त्यावेळी हिंदी भाषा वादात पडला होता. (Kiccha Sudeep on south films ending Bollywood's dominance in Hindi market: 'Everything has to come to an end')
किच्चा सुदीप एका कार्यक्रमात म्हणाला होता,''हिंदी राष्ट्रभाषा नाही''. त्याच्या त्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मात्र वातावरण तापलं होतं. अगदी बॉलीवूडच्या टॉपच्या स्टार्सनी या वादात उडी मारेपर्यंत प्रकरण पोहोचलं होतं. अजय देवगणने(Ajay Devgan) त्यावेळी ट्वीटरवर किच्चा सुदीपच्या हिंदी भाषेवरुन केलेल्या वक्तव्यावर नाराजगी व्यक्त करत त्याला सुनावलं देखील होतं.
किच्चा सुदीपने मात्र त्यानंतर पूर्ण विनम्रतेने उत्तर दिलं होतं. आता मात्र पुन्हा किच्चा सुदीप असं काही म्हणून बसला आहे की ते कदाचित हिंदी सिनेमे पाहणाऱ्या चाहत्यांना खटकेल अन् सोशल मीडियावर पुन्हा एकदा वाद सुरु होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत किच्चा सुदीपने हिंदी भाषिक राज्यात साऊथ सिनेमांची धूम यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. तो म्हणाला आहे की,''जेव्हा कथा दमदार असेल,तेव्हा ती प्रत्येक ठिकाणच्या माणसाच्या मनाला भिडते. हे कुणी जबरदस्तीनं थोपवलेलं नाही प्रेक्षकांवर. हे आपोआप घडतंय. हा त्या सिनेमाच्या कथेचा विजय आहे''.
जेव्हा किच्चा सुदीपला विचारलं गेलं की,'आतापर्यंत असं का घडलं नव्हतं,याला प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी संस्कृती,परंपरा कारण ठरत होती का?' तेव्हा तो म्हणाला,''आम्ही साऊथमध्ये 'हम दिल दे चुके सनम', 'मैने प्यार किया' सिनेमांना उचलून धरलंच की. 'शोले', 'हम साथ साथ है', 'कभी खुशी कभी गम' हे सिनेमे साऊथमध्ये चांगले चालले. आम्ही बंगळुरुच्या सिनेमाहॉलमध्ये बसून गुजराती,पंजाबी संस्कृती,परंपरा दाखवणाऱ्या कथा पाहिल्यातच की. याचा संबंध संस्कृतीशी नाही. जर मी तुम्हाला आजपर्यंत तुम्ही जे पाहिलं नाही,अनुभवलं नाही असं काहीतरी दाखवेन तर तुम्हाला त्यात रुची आपोआप येणार,तिथे जबरदस्ती करावीच लागणार नाही''.
दाक्षिणात्य सिनेमांना आता उत्तर भारतातील थिएटर्समध्ये देखील प्रदर्शित होण्याची संधी मिळतेय,कुठलेच नियम,बंधनं नाहीत यावर किच्चा सुदीपने आनंद व्यक्त केला. तो पुढे म्हणाला,''प्रत्येक गोष्टीचा शेवट कधीतरी होणारच असतो,ज्यामध्ये या नियमांचा,विरोधांचा,वादांचा समावेशही आहे. आधी देखील साऊथचे सिनेमे नॉर्थमध्ये रिलीज केले जायचे पण सॅटेलाईट टीव्हीच्या माध्यमातून. मी जेव्हा दिल्ली,गोवा,मुंबई,जयपूर जायचे तेव्हा लोक मला ओळखायचे तिथे आणि म्हणायचे,हा 'बाजीराव' मधला हिरो आहे. कारण माझ्या 'कॅम्पे गौडा' सिनेमाला हिंदीत 'बाजीराव' टायटल करुन डब केलं गेलं होतं.
'विक्रांत रोना' हा किच्चा सुदीपचा सिनेमा पॅन इंडियाचा सिनेमा आहे. या सिनेमाला कन्नड, हिंदी व्यतिरिक्त आणखी पाच भाषांमध्ये रिलीज केलं जाणार आहे. 'विक्रांत रोना' २८ जुलै रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित केलं जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.