Kiccha Sudeep ने खान मंडळींची उडवली खिल्ली, म्हणाला,'हार्टअटॅक येईल जर...'

हिंदी राष्ट्रभाषा नाही हे वक्तव्य केल्यानंतर किच्चा सुदीपचा बॉलीवूड अभिनेता अजय देवगणसोबत जोरदार वाद रंगला होता.
Kiccha Sudeep speaks Shah Rukh Khan and Salman Khan,together for a film might get a heart attack!'
Kiccha Sudeep speaks Shah Rukh Khan and Salman Khan,together for a film might get a heart attack!' Google
Updated on

कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप(Kiccha Sudeep) आपल्या आगामी 'विक्रांत रोना'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या आठवड्यातच हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. किच्चा सुदीपला कोरोनाची लागण झाल्याची बातमी होती,आणि त्यामुळे तब्येत बिघडल्यानं अभिनेत्यानं काही दिवस प्रमोशनमधून काढता पाय घेतला होता. पण किच्चानं मात्र कोरोना आपल्याला झाला नव्हता तर व्हायरल इन्फेक्शन असल्याचं आता सांगितलं आहे. नुकत्याच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत किच्चाने सलमानसोबतचं आपलं नातं, हिंदी राष्ट्रभाषेवरुन निर्माण झालेला वाद याविषयी बोलतानाच शाहरुख-सलमानला एकाच सिनेमात पूर्णवेळ घेतलं तर ते पाहून पाहणाऱ्या लोकांवर काय संकट येईल हे सांगत खान मंडळींची खिल्ली उडवली आहे.(Kiccha Sudeep speaks Shah Rukh Khan and Salman Khan,together for a film might get a heart attack!')

Kiccha Sudeep speaks Shah Rukh Khan and Salman Khan,together for a film might get a heart attack!'
Hijab: 'याच कारणानं मी हिजाबचा स्विकार केला', अखेर सना खानने सोडलं मौन

जेव्हा मुलाखतीत किच्चाला विचारलं गेलं की,''तू नेहमी कन्नड सिनेमात लीड व्यक्तिरेखा साकारल्या आहेस. पण असं असताना अनेक सिनेमातून सहकलाकाराची व्यक्तिरेखा देखील साकारली आहेस. तु खरोखरच पॅन इंडियाचा समर्थक होतास,जो आता एक कळीचा मुद्दा बनला आहे?'' त्यावर किच्चा सुदीप म्हणाला,''माझ्या डोक्यात असा कुठलाच अंजेंडा नव्हता कोणत्याही विषयाला घेऊन. मला फक्त एवढंच माहित होतं की, मी त्या सर्व लोकांसाठी काम करतो जे माझ्यासोबत काम करण्यास इच्छुक आहेत. काहीजण होते ज्यांनी त्यांच्या सिनेमात मी काम करावं यासाठी माझ्याशी संपर्क केला होता. मग तो 'रक्तचरित्र' सारखा सिनेमा असू दे ,ज्याच्यासाठी मला बोलावलं गेलं,किंवा मग 'नरसिंहा रेड्डी' सारखा सिनेमा असू देत. मी जर हा सिनेमा केला नसता,कारण यात खलनायकाच्या भूमिका आहेत,तर अशाच विचारांनी मी प्रवास कदाचित सुरुही ठेवला असता. पण माझ्या हातातून खूप चांगल्या भूमिका निसटून गेल्या असत्या''.

Kiccha Sudeep speaks Shah Rukh Khan and Salman Khan,together for a film might get a heart attack!'
Bharti Singh च्या बाळाचा नवा फोटो नेटकऱ्यांना खटकला;म्हणाले,'हे योग्य नाही'

अजय देवगणसोबत हिंदी राष्ट्रभाषे वरनं झालेल्या वादावर किच्चा पुढे म्हणाला की,''जर तुम्ही एखाद्या पब्लिक प्लॅटफॉर्मवर एखादी गोष्ट विचारता आणि मी त्याचं उत्तर पर्सनल फोन करुन देणं हे समाजाच्या दृष्टीने मी योग्य केलं नसतं. अजय देवगण यांनी बोलण्याआधी विचार करायला हवा होता,मला नाही. त्यांनी पब्लिकमध्ये विचारलं मी तिथेच उत्तर दिलं. पण याचा अर्थ असा नाही ते चुकीचे आहेत. अजय देवगणसाठी माझ्या मनात सम्मान आहे,ते एक चांगले व्यक्ती आहेत. आम्ही एकदा भेटलो आहोत आणि आमच्यात खूप चांगला संवादही घडला होता''.

Kiccha Sudeep speaks Shah Rukh Khan and Salman Khan,together for a film might get a heart attack!'
'Sexy मुलीचं अंगप्रदर्शन चालतं,मग मुलाचं का नाही? रणवीरच्या पाठीशी रामू

याच मुलाखतीत किच्चा सुदीपने शाहरुख (Shahrukh Khan),सलमानविषयी देखील भाष्य केलं आहे. तो म्हणाला आहे,''जर शाहरुख-सलमान एकाच सिनेमात आहेत, अगदी आताच्या सिनेमात एकत्र काम करत आहेत तर कसा सिनेमा बनवावा लागेल? सिनेमाकडून काय अपेक्षा असतील? आणि बरं ,कॅमियो सिनेमा नाही तर दोन हिरोंचा अखंड सिनेमा असेल,तर अर्थातच अपेक्षा आकाशाला भिडणाऱ्या असतील. कोण दिग्दर्शित करेल त्या सिनेमाला? सिनेमाच्या शेवटपर्यंत कोण हसणार? लोकांना हार्टअटॅक येईल?'' आता असं बोलून किच्चा सुदीपला नेमकं शाहरुख-सलमानच्या सिनेमांविषयी काय म्हणायचंय हे एव्हाना कळलं असेलच. त्यानं दोघांवर स्तुतीसुमनं उधळत आहोत असं दाखवत हळूच त्यांची खिल्ली देखील उडवल्याचं स्पष्ट दिसून येतंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()