कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप(Kiccha Sudeep) आपल्या विक्रांत रोना सिनेमामुळे सध्या भलताच चर्चेत आहे. हा पॅन इंडिया सिनेमा आहे. विक्रांत रोना, आरआरआर, आणि केजीएफ २ सारखाच हा यशस्वी पॅन इंडिया सिनेमा ठरेल की नाही हे लवकरच कळेल. पण आता आपण किच्चा सुदीपच्या लव्हलाईफ(Lovelife) विषयी जाणून घेणार आहोत. तसं पाहिलं तर त्याची मॅरिड लाईफ जरा फिल्मीच आहे. प्रेम,लग्न आणि मग घटस्फोटासाठी(Divorce) अर्ज...किच्चा सुदीपच्या वैवाहिक आयुष्यात आलेलं हे वादळ भलतंच लाइमलाइटमध्ये राहिलं. पण बोलतात ना ज्याचा शेवट गोड, तर सगळंच गोड. किच्चाच्या वैवाहिक आयुष्याचा एन्डही हॅप्पीच राहिला बरं.(Kiccha Sudeep's divorce to patch up with wife Priya)
किच्चा सुदीपची भेट २००० सालात प्रिया राधाकृष्णन सोबत बंगळुरात झाली. १ वर्ष डेटिंग केल्यानंतर त्या दोघांनी लग्न केलं. लग्नाआधी प्रिया एअरलाइन कंपनी आणि बॅंकेत काम करत होती. किच्चा आणि प्रियाची एक मुलगी देखील आहे. पण एक वेळ अशी आली की जेव्हा किच्चाच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झाले. २०१५ मध्ये कपलने वेगळा होण्याचा निर्णय घेतला होता. त्या दोघांनी कोर्टात तसा रीतसर घटस्फोटासाठी अर्ज देखील केला होता. पण घटस्फोट झाला का? तर नाही, खरी कहाणी वेगळीच आहे,जी त्या घटस्फोटाच्या अर्जानंतर सुरु झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, घटस्फोटाचा अर्ज करण्यापूर्वी ४ वर्ष किच्चा आणि त्याची पत्नी वेगळे राहत होते. अर्थात तेव्हा ते वेगळे राहत असले तरी आपल्या मुलीसाठी एकत्र यायचे. आपल्या वैवाहिक आयुष्यातील तणावाची त्यांनी कोणालाच कानोकान खबर लागू दिली नाही. किच्चा सुदीपने बायकोकडून मुलीची कस्टडी आपल्याकडे घ्यायची नाही असा निर्णय आधीच घेतला होता. पण बोललं जातं की जर त्यांचा घटस्फोट झाला असता तर किच्चा सुदीपला बायकोला १९ करोड रुपये पोटगी दाखल द्यावे लागले असते.
पण किच्चा आणि त्याची पत्नी प्रियानं आपल्या नात्याला एक संधी द्यायची ठरवलं.घटस्फोटाच्या अर्जानंतर प्रक्रिया पुढे सरकली नाही. यानंतर तब्बल एक वर्षांनी किच्चा आणि त्याच्या पत्नीनं मुलीसाठी आपल्या नात्याला एक संधी देण्याचं ठरवलं. याचा परिणाम हा झाला की त्यांचं लग्न तुटण्यापासून वाचलं. ते पुन्हा एकत्र आले, आणि त्यांच्यातील बॉन्डिंग आधीपेक्षा मजबूत झालं. ते दोघेही आता त्यांचं वैवाहिक आयुष्य आनंदात जगत आहेत. कधी कधी सेलिब्रिटींचे आयुष्य सर्वसामान्य माणसालाही मोठा धडा शिकवून जातं. अनेकदा मार्गदर्शकही ठरतं, ते काही खोटं नव्हे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.