The Kapil Sharma Show: कपिल शर्मा शोमधील हा लोकप्रिय अभिनेता झाला पोरका, दोन महिन्यात आई - वडिलांचं निधन

कपिल शर्मा शोमधल्या सुप्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन
kiku sharda from the kapil sharma show has lost parents within 2 months
kiku sharda from the kapil sharma show has lost parents within 2 monthsSAKAL
Updated on

आई - वडिल असताना आपल्याला कशाची चिंता नसते. आपण खुशाल जगत असतो. पण आई - वडिलांचं छत्र गमावल्यावर हेच जग काहीक्षण उदास आणि भकास वाटतं.

कपिल शर्मा शोमध्ये सर्वांना खळखळून हसवणाऱ्या अभिनेता किकू शारदाच्या आयुष्यात ही दुःखद घडलीय. गेल्या दोन महिन्यात किकूच्या डोक्यावरचं आई- बाबांचं छत्र हरपलं आहे.

(kiku sharda from the kapil sharma show has lost parents within 2 months)

kiku sharda from the kapil sharma show has lost parents within 2 months
Gauri Kulkarni Engagament: आई कुठे काय करते फेम गौरी कुलकर्णीने केला साखरपुडा?

इंस्टाग्राम पोस्टमध्ये किकू शारदाने आपल्या आई-वडिलांचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “गेल्या 2 महिन्यांत दोघांनाही गमावले. माझी आई आणि माझे बाबा. आई – मला तुझी खूप आठवण येते आई, मी तुझ्याशिवाय आयुष्याचा विचारही केला नव्हता. आता माझ्या टीव्ही शोबद्दल मला कोण फीडबॅक देईल, मी कुठे चुकत आहे आणि मी कुठे बरोबर आहे हे कोण सांगेल, माझ्या प्रत्येक यशावर कोण आनंदी होईल आणि माझ्या प्रत्येक आघातावर कोण दुःखी होईल. केबीसीचा एपिसोड पाहिल्यानंतर मला कोण फोन करेल आणि सांगेल की अमिताभ बच्चन यांनी आज काय मजा केली? तुझ्याकडून खूप ऐकलं होतं, खूप काही बोलायचं होतं तुझ्याकडून, खूप काही मागितलं होतं तुझ्याकडून, हे सगळं कोणाकडून?

किकूने वडिलांची आठवण जागवताना लिहिले, “बाबा – मी तुम्हाला नेहमीच खूप खंबीर, आत्मविश्वासाने, आयुष्याचा पुरेपूर आनंद घेताना पाहिले आहे. तुमच्या मुलांसाठी आणि नातवंडांसाठी तुम्ही अनेक योजना आखल्या होत्या, तुमच्यासाठी कुटुंब सर्वात महत्वाचे आहे. 'सकारात्मकता' या शब्दाचं वर्णन म्हणजे तुम्ही. मी तुम्हाला आयुष्यात फक्त सकारात्मक विचारच करताना पाहिले. जीवनातील सर्वात मोठ्या धक्क्यांमध्ये, तुमची नेहमीच प्रसन्न बाजू मी पाहिली. तुमच्याकडून बरेच काही शोधायचे होते.”

kiku sharda from the kapil sharma show has lost parents within 2 months
Shreya Bugde: "आणि अश्रू अनावर झाले", बाप्पाला निरोप देताना श्रेया बुगडे झाली भावुक

किकूने आई - बाबांना श्रद्धांजलीचा देताना शेवटी लिहिले, “तुम्ही दोघांनाही निघण्याची घाई केली. जरा थांबा, काही गोष्टी बाकी होत्या. तुम्ही एकमेकांना कायम सोबत राहण्याचे वचन दिले आहे आणि तुम्ही आजही एकत्र आहात. आई आणि बाबा तुमची आठवण येते.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.