Kinshuk Vaidya: शाका लाका बूम बूम मधील अभिनेत्यावर अलिबागमध्ये घडली धक्कादायक घटना, पोलिसात तक्रार

संजू फेम अभिनेता किंशुक वैद्यवर संकट ओढवलं आहे
kinshuk vaidya filed a complaint of harassment in the local police of alibaug
kinshuk vaidya filed a complaint of harassment in the local police of alibaug SAKAL
Updated on

Kinshuk Vaidya News: शाका लाका बूम बूम हि मालिका लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची. याच मालिकेतील संजू तुम्हाला आठवत असेलच. आता संजू फेम अभिनेता किंशुक वैद्यवर संकट ओढवलं आहे.

अलिबागमधील स्थानिकांकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप त्याने केलाय. किंशुकने नागावच्या सरपंचाविरुद्ध तक्रार दाखल केलीय.

अवैध प्रकारे त्याने एका जमीन मालकाला कामावर ठेवले असून त्याची माणसं कर्मचारी गेटची तोडफोड करत असल्याचा आरोप त्याने केलाय.

(kinshuk vaidya filed a complaint of harassment in the local police of alibaug )

kinshuk vaidya filed a complaint of harassment in the local police of alibaug
Shahu Maharaj Jayanti: महाराज, जात पाहून नोकऱ्या देता, किरण मानेंची शाहू महाराजांविषयी पोस्ट एकदा वाचाच

किंशुक वैद्य यांनी सांगितले की, 'माझ्याकडे नागावमध्ये वडिलोपार्जित मालमत्ता आहे, तिचे 2022 मध्ये रिसॉर्टमध्ये रूपांतर झाले. आता काही महिन्यांपासून काही स्थानिक रहिवासी त्रास देत आहेत.

25 जून रोजी सकाळी साडेआठ वाजता नागावचे सरपंच निखिल मयेकर यांनी त्यांच्या एका मित्राला माझ्या स्टाफचे गेट तोडण्याचे आदेश दिले. ज्याला हे करण्यास सांगितले आहे तो जमीन मोव्हरचा मालक आणि ऑपरेटर आहे.

किंशुक वैद्यने सांगितले की, त्यांच्याकडे घटनेचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग आहेत. यानंतर त्यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून पुरावेही पोलिसांकडे सादर केले.

किंशुकने सांगितले की, त्याचा छळ करण्यामागचं कारण, त्यांना एक रुंद रस्ता हवा आहे आणि हि गोष्ट तेव्हाच शक्य आहे जेव्हा किंशुक त्याची थोडी जमीन त्यांना देईल. आणि हे तर शक्य नाही.

kinshuk vaidya filed a complaint of harassment in the local police of alibaug
KKK 13 Shiv Thakare: वाघ खतरो के खिलाडीमध्येही गरजला! मराठमोळा शिव झाला पहिला फायनलिस्ट

किंशुक म्हणाला की, त्याचा देशाच्या कायदा आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्याला फक्त हा छळ थांबवायचा आहे.

दुसरीकडे 'ईटाईम्स'ने सरपंच निखिल यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी हे सर्व खोटे असल्याचे सांगितले.

किंशुकने स्थानिकांना त्रास दिल्यानेच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ते याप्रकरणी दखल घेतील. आता या प्रकरणाला पुढे कोणतं वळण लागणार हे पाहायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.