'देवमाणूस'चा शेवटचा एपिसोड शूट करताना किरण गायकवाडला अश्रू अनावर

जवळपास वर्षभर देवमाणूस या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं.
kiran
kiran
Updated on

झी मराठीवरील देवमाणूस Devmanus या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं. या मालिकेचं कथानक तसंच त्यातील व्यक्तिरेखा या सगळ्यांवर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग याची भूमिका अभिनेता किरण गायकवाडने Kiran Gaikwad एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. १५ ऑगस्ट रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. दोन तासांचा महाएपिसोड यादिवशी प्रसारित झाला होता. शेवटच्या दिवशी शूटिंग करताना किरण सेटवर अत्यंत भावूक झाला होता. सेटवरील एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. मालिकेविषयी आणि भूमिकेविषयी बोलताना किरणला कंठ दाटून आला.

"असं काहीतरी होईल, असा काही सीन करावा लागेल याचा विचार कधीच नव्हता केला. त्रास होतोय खूप. नांदी होते, पडदा उघडतो, रंगमंचावर वावर होतो, प्रेक्षकांच्या टाळ्या आणि खूप प्रेम मिळतं. हे सर्व झाल्यानंतर प्रेक्षालय जसं रितं होतं ना, पोटात खूप कालवा झालाय. शब्द नाहीत माझ्याकडे, खूप त्रास होतोय. पुन्हा एकदा भेटू लवकरच", असं तो या व्हिडीओत बोलताना दिसतोय. हे बोलतानाही किरण भावूक झाला होता.

kiran
Indian Idol: ".. तर मी शांत बसणार नाही"; आदित्य नारायणची सडेतोड भूमिका

जवळपास वर्षभर देवमाणूस या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. त्यामुळे कलाकारांना आणि त्यासोबतच प्रेक्षकांना या मालिकेला निरोप देताना वाईट वाटणं साहजिक आहे. शेवटच्या एपिसोडमध्ये डॉ. अजितकुमार देव याचा मुखवटा अखेरीस उतरला आणि त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला. ही मालिका आणि देवीसिंगची भूमिका खूप जवळची असल्यामुळे या मालिकेला निरोप देताना मन भरून आलं अशा भावना अभिनेता किरण याने व्यक्त केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.