Dhruv Rathee : "इस व्हिडीओने आग लगा दी भाई..."; ध्रुव राठीच्या 'त्या' व्हिडीओचं किरण मानेंकडून तोंडभरुन कौतुक

Dhruv Rathee : अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी ध्रुवच्या व्हिडीओबाबत नुकतीच एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे.
Kiran Mane,Dhruv Rathee
Kiran Mane,Dhruv Ratheeesakal
Updated on

Dhruv Rathee : युट्यूबर ध्रुव राठी (Dhruv Rathee) हा सध्या त्याच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. ध्रुवनं त्याच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहेत. काही जण या व्हिडीओचं कौतुक करत आहेत तर काहींनी या व्हिडीओमुळे ध्रुवला ट्रोल केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी ध्रुवच्या व्हिडीओबाबत नुकतीच एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून किरण माने यांनी ध्रुवचं कौतुक केलं आहे.

किरण माने यांची पोस्ट

किरण माने यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, "ध्रुव राठी ! इस व्हिडीओने आग लगा दी भाई.संविधानावर आणि आपल्या देशावर प्रेम असणार्‍या प्रत्येकानं बघा. बघाच. पुन्हा पुन्हा बघा. शेअर करा."

किरण माने यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, "शंभर न्यूज चॅनल्स, दोन वर्ष करू शकणार नाहीत एवढा जबरी प्रभाव ध्रुव राठीच्या एका व्हिडीओनं साधलाय. जगभर व्हायरल होतोय. भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर होतेय. मराठीमध्ये कुणी करतंय का?"

कोण आहे ध्रुव राठी?

ध्रुव हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याच्या युट्यूब चॅनलला 14.9 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. ध्रुव हा विविध विषयांवर आधारित व्हिडीओ युट्यूबवर शेअर करतो. दोन दिवसांपूर्वी युट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ध्रुवनं मोदी सरकारवर कडकडून टीका केली आहे. सध्या ध्रुव हा त्याच्या या व्हिडीओमुळे चर्चेत आहे.

Kiran Mane,Dhruv Rathee
kiran mane: "ते एक ड्रेनेज झालं आहे"; किरण मानेंचा नेमका टोला कोणाला?

जाणून घ्या किरण माने यांच्याबद्दल...

किरण माने हे मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. विविध विषयांवर आधारित पोस्ट ते शेअर करतात. काही दिवसांपूर्वी किरण माने यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्या राजकारणामधील एन्ट्रीची चर्चा सोशल मीडियावर झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.