Kiran Mane Post : '...आणि माझ्या डोळ्यांत पाणी तरळलं' मातोश्री वरील उद्धव ठाकरेंच्या भेटीबद्दल लिहिताना किरण माने भावूक

येत्या काळात किरण माने एका नव्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.
Kiran Mane Marathi Actor Uddhav Thackeray
Kiran Mane Marathi Actor Uddhav Thackerayesakal
Updated on

Kiran Mane Marathi Actor Uddhav Thackeray : टीव्ही मनोरंजन आणि चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर चाहत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी किरण माने यांना शिवबंधन बांधत पक्षात नवी जबाबदारी दिल्याची माहिती सुत्रांनी दिले आहे.

येत्या काळात किरण माने एका नव्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. या सगळ्यात किरण माने यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या त्या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्या मातोश्री नावाच्या वास्तूविषयी ऐकले होते, वाचले होते तिथे जाण्याचा योग आला आणि त्यानंतर जे काही घडलं हे माने यांनी त्या पोस्टमध्ये सांगितले आहे. माने हे त्या पोस्टमध्ये भावूक झाल्याचे दिसून आले आहे.

माने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ..."किरणजी, तुमचे लेख मी वाचलेत. फार छान लिहीता. उद्धवजी येतील थोड्या वेळात, तुम्ही आधी नाष्टा-चहा करून घ्या. रिलॅक्स व्हा. हे तुमचंच घर आहे." रश्मीवहिनींनी स्वागतच असं केलं की, 'मातोश्री' विषयी मी कॉलेज जीवनापास्नं ऐकलेल्या अनेक गोष्टी झरझरझरझर डोळ्यांसमोरून जाऊ लागल्या.

अमिताभ बच्चनपासून दादा कोंडके, नाना पाटेकरांपर्यन्त अनेकांनी मीनाताई ठाकरेंच्या आदरातिथ्याबद्दल अनेक मुलाखतींमधून सांगीतलेल्या अनेक गोष्टी माझ्या मेंदूत कोरलेल्या आहेत. अगदी तसेच आदरातिथ्य रश्मीवहिनी करत होत्या. आम्ही भरभरुन गप्पा मारल्या. मी विचार करत होतो, गेल्या दोन तीन वर्षांत हे कुटूंब अनेक जीवघेण्या आघातांमधनं गेलंय. जवळच्यांनी, रोज या घरात वावरणार्‍यांनी केलेले ते घाव अजूनही ओले आहेत. वेदना होत असणार. तरीही या माऊलीच्या चेहर्‍यावरचं हास्य जराही मावळलेलं नाही. सगळं दु:ख पचवून चेहरा प्रसन्न ठेवायला जिगरा लागतो. माझ्या डोळ्यांत पाणी तरळलं.

गेली चार दशकं 'मातोश्री' या वास्तूचं आकर्षण अख्ख्या महाराष्ट्राला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला 'मातोश्री' हा अजिंक्यतारा आहे, हे विरोधकही नाकारणार नाहीत ! मुंबईत भले कितीही उंच टॉवर्स उभे राहोत, 'मातोश्री'पुढे सगळं खुजं आहे.

मला बहिणीसारख्या असलेल्या सुषमा अंधारेताईंनी 'मातोश्री'वर बोलावले तेव्हापासून काळीज धडधडायला लागलंवतं ! सुषमाताई म्हणजे मायेची सावली. दोन वर्षांपूर्वी माझ्यावर जो मोठा आघात झाला होता, तेव्हा ओळख नसतानाही स्वत:हून फोन करुन भेटून, मला न्याय मिळावा म्हणून माझ्यासाठी जीवाचं रान केलेले जे दोनचार लोक होते, त्यांपैकी एक सुषमाताई. त्याविषयी सविस्तर लिहीन नंतर. पण त्या सोबत असल्यामुळे एक दिलासा होता.

उद्धवजी आले. सोफ्यात बसले. मनात आलं, इथेच कधीकाळी बाळासाहेब ठाकरे बसत असतील ! 'कधी आलात किरणजी?' उद्धवजींच्या प्रश्नानं भानावर आलो. चर्चा सुरू झाली. मी मुद्दाम ठरवून प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारधारेचा विषय काढला. त्यावर उद्धवजी इतके सविस्तर बोलले की मी अवाक झालो. त्यांच्या विचारांचा सगळा अर्क उद्धवजींच्या नसानसात आहे, हे जाणवलं. प्रबोधनकारांची शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकरांसोबतची एक दादरच्या गणेशोत्सवातली आठवण जेव्हा उद्धवजींनी सांगितली, तेव्हा मनाशी म्हटलं, ये वजह है के ये बंदा अभी भी डटकर खडा है !

Kiran Mane Marathi Actor Uddhav Thackeray
Kiran Mane in Politics: अभिनेते किरण मानेंनी शिवबंधन बांधत केला ठाकरे गटात प्रवेश; बोलताना म्हणाले, "राजकारण गढूळ..."

काही वेळा राजकारणात काही गोष्टींत तडजोडी कराव्या लागतात, त्या पूर्वी त्यांनी केल्याही असतील... पण आता संविधान पोखरून समोर जो विषमतेचा, अन्यायाचा, अराजकाचा दहशतीचा अक्राळविक्राळ राक्षस उभा राहिला आहे, त्याची पुरेपुर जाणीव असलेले देशात जे आठदहा नेते उरले आहेत... त्यातले एक उद्धवजी ठाकरे आहेत, हे नक्की ! बास. आणखी काय पायजे? आता एक होऊन लढायचं. बाकी बारीकसारीक मतभेद सगळीकडेच रहाणार. ध्येय फिक्स झालंय ना? विषय कट.

बाकी सविस्तर बोलत राहीन. पण फिकीर करू नका भावांनो, ह्यो सातारी वाघ मागं हटनार नाय. आपली विचारधारा ह्यो आपला 'नाद' हाय. त्यो कुटं जात न्हाय. शिवसेना आपलीशी केलीय. आता उतनार नाय, मातनार नाय... घेतला वसा टाकनार नाय. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र...अशा शब्दांत किरण माने यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()