Kiran Mane Post On Jalna Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला असून मराठवाड्यातील मराठा आंदोलक आरक्षणावर ठाम आहे. जालन्यात आंदोलक उपोषण थांबवण्यास तयार नाही. अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे शातंतेत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात दगडफेक झाल्याचा दावा करून पोलिसांकडून लाठीमार झाला आणि आंदोलनाला गालबोट लागलं.
यात पोलिस आणि ग्रामस्थ जखमी झाले. ही घटना संतापजनक होती. त्यानंतर आता केवळ त्या भागापुरतं हे आंदोलन मर्यादित राहिलं नसून आता त्याचे पडसाद राज्यभर पसरले आहे. 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 लोक आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते.
आता त्या आंदोलनात लाठीचार्ज झाला आणि वातावरण पेटलं. आता एकीकडे या पार्श्वभूमीवर राज्य सरकार बैठकी घेत आहेत तर विरोधी नेते सरकारवर टीका करत आहे. या प्रकरणावर आत्तापर्यंत अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
त्यात मनोरंजन विश्वातील कलकारांनीही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहे. आता त्यातच मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतलं नाव किरण माने यांनी देखील आरक्षणाच्या प्रश्नावर भाष्य करणारी एक पोस्ट शेयर करत जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणी संताप व्यक्त केला आहे.
किरण माने आपल्या पोस्टमध्ये लिहितात की, "माझ्या मराठा बांधवांनो… थेट बोलतो… आपल्याला धर्माच्या नावावर भडकवणारेच आज आपल्या पाठीत खंजीर खुपसत हायेत. सावध होऊया. खरा शत्रू ओळखूया. आता तरी आपला खरा धर्म ओळखूया. धर्म संकटात आला की आपली मदत घेतली जाते आणि आपल्यावर हल्ला झाला की ‘एका जातीवर’ झाला असं समजलं जातं. आधी शेतकर्यांवर, मग वारकर्यांवर आनि आता या आंदोलनावर आघात झालाय. मराठा आरक्षण कुनाला नको हाय, ते शोधायला लै लांब नाय जावं लागनार. फक्त आपल्या धडावर आपलं डोकं असायला पायजे.
मनोज जरांगे पाटील…तुमच्याबद्दल काय बोलू? या भाकड काळात तुमी जे बोलताय ते बोलायला जिगरा लागतो! परवा आमच्या आयाबहिनींचं रक्त पाहिल्यापास्नं आमचंबी काळीज तुमच्याइतकंच तुटतंय… रक्त सळसळायला लागलंय… हात शिवशिवताहेत. आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत. फक्त सावध रहा. शत्रू कुटिल कारस्थानी आहे. सहकार्यांवर लक्ष ठेवा. आंदोलनात छुपी घुसखोरी करून आंदोलन हायजॅक करण्याचा इतिहास ताजा आहे. आता सावधपणे, भान ठेवून शेवटचा घाव घालूया सगळे मिळून. आता रस्त्यावर उतरायची वेळ आलीय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रचंड इच्छा होती. ते म्हणालेही होते की ‘एक दिवस मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासेल, पण त्यावेळी ते द्यायला मी नसेन !’
अशा पोस्टवरनं जे कायम मला ट्रोल करतात त्यांना खरंतर मी एका केसाचीबी किंमत देत नाय. पन आज एक सांगतो, मी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पाईक हाय. कुनाच्या बापाला घाबरत नाय. काम काढून घेनन्याफिन्याला भेत नाय. मनगटाच्या बळावर मातीतनं पिकवून खानार्या शेतकर्याची औलाद हाय. कुनापुढं लाचार होनार नाय. समाजासाठी, गोरगरीबांसाठी आनि माझ्या शेतकर्यांसाठी वाट्टंल ती किंमत मोजून मी बोलनार. जीवात जीव असेपर्यन्त बोलत र्हानार.
आंदोलनकर्त्या भावाबहिनींनो, तुमच्या रक्ताच्या सांडलेल्या एकेका थेंबाची किंमत वसूल झाली पायजे… न्याय मिळालाच पायजे.
जय शिवराय. जय भीम.किरण माने.
एकमराठालाख_मराठा"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.