Kiran Mane: "आता आरक्षणातच माझा राम...", किरण मानेंची मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खरमरीत पोस्ट

किरण मानेंनी अयोध्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर खास पोस्ट केलीय
kiran mane on maratha aarakshan andolan and ayodhya ram mandir
kiran mane on maratha aarakshan andolan and ayodhya ram mandir SAKAL
Updated on

Kiran Mane on Maratha Aarakshan: किरण माने हे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. मानेंनी कायमच राजकीय - सामाजिक विषयांवर स्पष्ट - परखड मतं व्यक्त केली आहेत. किरण माने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.

अशातच किरण माने यांनी सोशल मीडियावर लेटेस्ट पोस्ट केलीय. यात त्यांनी आज होत असणाऱ्या राम मंदिर सोहळा आणि मराठा आरक्षण अशा दोन्ही मुद्द्यांवर भाष्य केलंय.

kiran mane on maratha aarakshan andolan and ayodhya ram mandir
Prajakta Mali: अयोध्या राम मंदिर सोहळ्यानिमित्त प्राजक्ता माळीने केलं हे आवाहन

किरण माने यांनी मराठा आरक्षणाचे फोटो शेअर करुन लिहीलंय की, "आम्ही हक्काचं आरक्षण मागतोय. बाकी कुठल्याही जातीवर अन्याय न करता ते द्या." अशी मागणी करत लाख्खोंच्या संख्येनं मराठा समाज बाहेर पडलाय. आपल्या अधिकारासाठी संवैधानिक मार्गानं आंदोलन सुरूय. या गर्दीत माझे स्वत:चे कितीतरी नातेवाईक आहेत. आपल्या पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षिततेच्या चिंतेनं त्यांना हे पाऊल उचलायला मजबूर केलंय."

किरण माने पुढे लिहीतात, "वयाची सत्तरी पार केलेले माझे एक नातेवाईकसुद्धा आंदोलनात हट्टाने सामील झालेत. मी फोन केला, "तुमची तब्येत आम्हाला महत्त्वाची आहे. परत या. लोकांनी घरात बसुन टीव्हीवर राममंदिराचा सोहळा बघावा म्हणून सुट्टी दिलीय सगळ्यांना. नातवंडं, पाहुणे आलेत. एकत्र मिळून बघा." ते म्हणाले, "नाही. ते बघून काय मिळनारंय? महागाई कमी हुनारंय का आपल्या पोरांना रोजगार मिळनारंय? आता आरक्षणातच माझा राम आहे. मुंबई हीच अयोध्या. नातवंडांसाठीच मी हे करतोय. आम्ही दुसर्‍याच्या ताटातला घास हिसकावून घेत नाही. आमचा हक्काचा आमच्या नातवंडांच्या मुखात पडायला हवा."

किरण माने शेवटी लिहीतात, "...मोर्चा जिथे जिथे जातोय तिथे दलित, मुस्लिम, धनगर, माळी असा सगळा समाज पाण्यापासून खाण्याची सगळी सोय बघतोय. ग्राऊंड लेव्हलवरचा बहुजन फुटलेला नाही, हे आशादायी चित्र आहे. राजकीय चित्र काहीही दाखवूदेत.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रचंड इच्छा होती. ते म्हणालेही होते की 'एक दिवस मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासेल, पण त्यावेळी ते द्यायला मी नसेन !' महामानवाच्या दूरदृष्टीला सलाम. जय शिवराय जय भीम.."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.