Kiran Mane: " कुणाची तुलना असामान्य महामानवांशी करून.." किरण मानेंचा मराठा समाजाला खास सल्ला!

Kiran Mane on Manoj Jarange
Kiran Mane on Manoj JarangeEsakal
Updated on

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्दा चांगालच चर्चेत आला. ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले, त्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला. मात्र आता मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणाच्या नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

सरकार जर सरसकट मराठा आरक्षण देणार असेल तर आम्ही त्यांना वेळ देण्यास तयार आहोत. वेळ घ्या पण सरसकट आरक्षण द्या असं म्हणत त्यांनी ससरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला. मात्र उपोषण मागे घेताना राज्यभरात मराठा समाजाचं साखळी उपोषण चालूच राहील, असं त्यांनी सांगितले.

Kiran Mane on Manoj Jarange
Milind Soman Happy Birthday : सलमान, शाहरुख, आमिर त्याच्यापुढे सगळे फिकेच! फिटनेसचा नाद नाय

मात्र तरीही राज्यात मराठा आरक्षणावरून वाद विवाद सुरुच आहेत. अशातच मराठी मनोरंजन विश्वातून अनेक कलाकारांनी पुढे येत मराठा आराक्षणावर भाष्य केले होते. त्यातच सुरुवातीसापासून मराठमोळे अभिनेते किरण माने यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देत वेळेवेळी या मुद्यावर पोस्ट शेयर करत यावर भाष्य केले आहे. आता पुन्हा किरण माने यांनी मराठा आरक्षणावर पोस्ट शेयर केली आहे.

Kiran Mane on Manoj Jarange
Urfi Javed: पोलिसांशी पंगा घेणं उर्फीला पडलं चांगलच महागात! खोटा व्हिडिओ बनवून दिशाभूल केल्याप्रकरणी FIR दाखल
 kiran mane
kiran mane

किरण माने आपल्या पोस्टमध्ये लिहितात की, "मराठा बांधवांनो…आपल्या महामानवांनी कधीही दुसर्‍या समाजाला कमी लेखलं नाही. तुकोबारायांनी विठ्ठलामध्ये बुद्धाला पाहिलं. छत्रपती शिवरायांनी सिद्दी इब्राहीमला अंगरक्षक पद दिलं.

शाहूराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा विश्वरत्न घडवला! आरक्षणाला समर्थन देताना परजातीला कमी लेखणे किंवा भावनेच्या भरात कुणाची तुलना असामान्य महामानवांशी करून कटुता आणणे या गोष्टी त्वरित थांबवा. आपली लढाई स्वबळावर लढुया, कुणाला कमी लेखून नाही."

Kiran Mane on Manoj Jarange
Ira Khan-Nupur Shikhare: आमिर खानच्या लाडक्या लेकीचं महाराष्ट्रीयन 'केळवण'! इरा आणि नुपूरच्या लग्नसराईला सुरुवात

सध्या किरण मानेंची पोस्ट सोशल मिडियावर चर्चेत आहे. नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत तर अनेकांनी त्यांच्या मताचे समर्थनही केले आहे. यापुर्वी देखील माने यांनी मराठा आरक्षणावर पोस्ट शेयर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.