Kiran Mane on Manoj Jarange: "संविधान गुंडाळू पहाणाऱ्या या व्यवस्थेला..."; मराठा आरक्षणासंदर्भात किरण मानेंची रोखठोक पोस्ट चर्चेत

बिग बॉस मराठी फेम अभिनेते किरण माने यांनी मराठा आरक्षणाला उद्देशुन एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Kiran Mane on Manoj Jarange
Kiran Mane on Manoj JarangeEsakal
Updated on

Kiran Mane on Manoj Jarange: सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या आंतरवाली येथे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केलं आहे.

पाणी आणि औषध घेणार नसल्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती. आपल्या समर्थकांच्या विनंतीनंतर ते पाणी प्यायले. मात्र जो पर्यंत सरकार मागणी मान्य करत नाही तोवर उपोषण सुरु राहणार असा पावित्रा त्यांनी घेतला आहे.

Kiran Mane on Manoj Jarange
Prakash Raj on Kangana: "भारताला २०१४ ला स्वातंत्र्य मिळालं म्हणुन", प्रकाश राजने उडवली खिल्ली, कंगनाही भडकुन म्हणाली...

अनेक राजकारण्यांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा देत त्यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता त्यातच मनोरंजन विश्वातून क्वचितच या उपोषणावर प्रतिक्रिया येत आहे. बिग बॉस मराठी फेम अभिनेते किरण माने यांनी मराठा आरक्षणाला उद्देशून  एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीय.

यातच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल लिहिले आहे. सध्या ही पोस्ट सोशल मिडियावर चर्चेत असून व्हायरल झाली आहे.

किरण माने आपल्या पोस्ट मध्ये लिहितात की, "जरांगे पाटील... या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलंय. खरंतर असं पूर्वी घडणं सहजशक्य होतं, कारण व्यवस्थेला संविधानाचा धाक असण्याचा तो काळ होता. आजच्या भवतालात, संविधान गुंडाळू पहाणाऱ्या या व्यवस्थेला तो धाक दाखवण्याचं' महान कार्य तुम्ही करताहात ! तब्येतीला सांभाळा. आम्हाला तुमची गरज आहे."

Kiran Mane on Manoj Jarange
Shubha Poonja: शुटिंग सुरु असतानाच लोकप्रिय अभिनेत्रीसोबत गुंडांनी केलं गैरवर्तन, चाकुचा धाक दाखवून...

आता त्यांची पोस्ट सोशल मिडियावर चर्चेत आली असून नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्यांने लिहिलंय, "संविधानाला विरोध करणाऱ्या अडानचोट लोकांना संविधानीक मार्गाने आपले हक्क मिळतात हे जरांगे यांच्या रूपाने नक्कीच दिसेल...चपराक " तर दुसऱ्याने लिहिलंय, "एका सामान्य माणसाचं असामान्य कर्तृत्व म्हणजेच मनोज जरांगे पाटील".

एकाने किरण मानेंवर प्रतिक्रिया देत लिहिलंय, "सिने सृष्टीमधील पहीलीच पोस्ट , धन्यवाद किरणजी माने ! समाज तुमच्यापण पाठीशी असेलच, बाकी सिनेसृष्टी झोपली वाटत असो!"

Kiran Mane on Manoj Jarange
The Lady Killer: अर्जुन कपूर - भुमी पेडणेकरची रोमॅंटिक केमिस्ट्री! 'द लेडी किलर'चा ट्रेलर रिलीज

यापुर्वी देखील किरण माने यांनी साताऱ्यात चाललेल्या मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या व्यक्तींना पाठिंबा देण्यासाठी त्यांची भेट घेतली होती आणि त्यावर एक लांबलचक पोस्टही केली होती. आता माने यांनी पुन्हा या मुद्यावर प्रतिक्रिया दिल्याने सोशल मिडियावर त्यांची चर्चा होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.