Marathi Rangabhumi Din: "सिनेमा गाजला, तर नाव मिळतं पण नाटक चाललं तर...", किरण मानेंची रंगभुमी दिनी खास पोस्ट

किरण मानेंनी मराठी रंगभूमी दिनानिमित्ताने खास पोस्ट लिहीली आहे
Marathi Rangabhumi Din: "सिनेमा गाजला, तर नाव मिळतं पण नाटक चाललं तर...", किरण मानेंची रंगभुमी दिनी खास पोस्ट
SAKAL
Updated on

आज मराठी रंगभूमी दिन. ५ नोव्हेंबरला मराठी रंगभुमी दिन साजरा केला जातो. मराठी रंगभुमीवर अनेक दिग्गज कलावंत होऊन गेले. डॉ. श्रीराम लागु, चित्तरंजन कोल्हटकर, डॉ. काशिनाथ घाणेकर अशा अभिनेत्यांपासुन ते विजया मेहता, भक्ती बर्वे, सुलभा देशपांडे अशा अनेक अभिनेत्रींनी रंगभुमी गाजवली.

अशातच किरण मानेंनी रंगभुमी दिनानिमित्ताने खास पोस्ट केलीय. ज्याची चांगलीच चर्चा आहे. काय म्हणाले किरण माने बघा.

Marathi Rangabhumi Din: "सिनेमा गाजला, तर नाव मिळतं पण नाटक चाललं तर...", किरण मानेंची रंगभुमी दिनी खास पोस्ट
Marathi News: विलासराव देशमुख यांच्या शेजारी असलेल्या या विनोदविराला ओळखलं का? आज गाजवतोय मराठी इंडस्ट्री

किरण माने यांनी त्यांच्या गाजलेल्या नाटकांची एक झलक शेअर केलीय. किरण माने लिहीतात,

"सिनेमा गाजला, तर तुम्हाला नांव देतो. टीव्ही मालिका चालली, तर तुम्हाला पैसा देते...
'नाटक' फक्त जीव लावून केलंत, तरी तुमचं अवघं व्यक्तीमत्त्व समृद्ध करतं !"

- रंगभूमीनं काय दिलं नाही???
रंगभूमीनं ओळख दिली..
आत्मविश्वास दिला..
भवतालाचं, समाजाचं भान दिलं..
भाषेवरचं प्रभुत्व दिलं, त्याबरोबरच 'बोली'चा गोडवाही दिला..
उच्च अभिरूचीचं वरदान दिलं...
सांस्कृतीक श्रीमंती दिली..

किरण माने शेवटी लिहीतात, "रंगभूमीवर जगलेल्या प्रत्येक क्षणानं मला अपार आनंद दिला.. कल्पनेपलीकडचं समाधान दिलं !
अजून काय पाहिजे?"

अशी पोस्ट लिहून किरण मानेंनी सर्वांना मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

किरण माने यांनी परफेक्ट मिसमॅच, चल तुझी सीट पक्की, उलट सुलट, मायलेकी, झुंड अशा गाजलेल्या नाटकांमध्ये अभिनय केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.