kiran mane: 'TDM'ला शोज मिळत नाहीत आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ला… किरण माने आज स्पष्टच बोलले..

खऱ्या अर्थानं मराठी 'दीन' झाली.. किरण माने यांनी व्यक्त केली खंत..
kiran mane post on tdm movie not get theatre and maharashtra shahir movie bad condition
kiran mane post on tdm movie not get theatre and maharashtra shahir movie bad conditionsakal
Updated on

kiran mane on marathi movie: एकीकडे मराठी चित्रपटांची वाहवा होत असली. दर्जेदार चित्रपट येत असले तरी मराठी चित्रपटांची अवस्था फारच बिकट आहे. याबाबत आता किरण माने यांनी परखड शब्दात मत व्यक्त केले आहे.

येत्या २८ एप्रिल रोजी मराठी मध्ये दोन दर्जेदार चित्रपट प्रदर्शित झाले. एक मराठी मातीतलं प्रेम दाखवणारा 'TDM' तर दुसरा शाहीर साबळे यांचा जीवनप्रवास उलगडणारा 'महाराष्ट्र शाहीर'. अत्यंत वेगळ्या धाटणीचे आणि प्रेक्षकांना भावतील असे हे चित्रपट आहेत. पण दुर्दैवाने हे चित्रपट कमाई करण्यात मात्र मागे पडले आहेत. पण असे का झाले याबाबतच आज किरण माने यांनी खंत व्यक्त केली आहे.

(kiran mane post on tdm movie not get theatre and maharashtra shahir movie bad condition)

kiran mane post on tdm movie not get theatre and maharashtra shahir movie bad condition
Maharashtra Shaheer: 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपट संपला आणि थिएटर मध्ये जे काही झालं ते पाहून..

सध्या TDM या सिनेमाला थिएटरमध्ये स्क्रीन मिळत नाहीय. नुकतंच यासंदर्भात या चित्रपटातील कलाकारांचा एक व्हिडिओ समोर आला होता. अक्षरशः कलाकारांना अश्रु अनावर झाले होते. या चित्रपटाचे शोच लागत नाहीतय त्यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट आहे.

तर केदार शिंदे दिग्दर्शित आणि अंकुश चौधरी याची प्रमुख भूमिका असलेला 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाचे कौतुक होत असले तरी हा चित्रपट मनासारखी कमाई होताना दिसत नाहीय. म्हणून आता मराठी चित्रपटांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच प्रकरणार किरण माने यांनी एक सणसणीत पोस्ट शेयर केली आहे.

किरण माने यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय की, 'अस्सल मराठी मातीतल्या TDM ला शोज मिळत नाहीत. मराठी मातीचा दरवळ देशभर पसरवणाऱ्या शाहिरांना सलाम करण्यासाठी आलेल्या 'महाराष्ट्र शाहीर'ला शोज आहेत पण प्रेक्षक नाहीत. यावेळी खऱ्या अर्थानं मराठी 'दीन' झाली आहे...' अशा शब्दात किरण माने यांनी सद्यस्थितीवर भाष्य केलं आहे.

किरण मानेंच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट करत आपलं मत मांडलं आहे. या पोस्टखाली कमेंट करत काही जणांनी 'महाराष्ट्र शाहीर' चे शो हाऊसफुल्ल चालू असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी एकाच दिवशी दोन सिनेमे प्रदर्शित केल्याने ही वेळ आली असं म्हटलं आहे. तर काहींनी TDM पाहायचा असून शो होत नसल्याने पाहता येत नाहीय, असेही म्हंटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.