मालिका जगतातील किरण माने प्रकरण सर्वांनाच ठाऊक आहे. स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका घराघरात पोहोचली होती. अचानक मालिकेतील प्रमुख कलाकार किरण माने यांना कोणत्याही कारणाशिवाय काढून टाकण्यात आले. हा प्रकार राजकीय असल्याचा आरोप किरण माने यांनी केलाय त्यानंर मोठा राजकीय गदारोळ माजला होता. शेवटी हे प्रकरण गैरवर्तनातून घडल्याचे वाहिनीने स्पष्ट केले. तर सेटवरीतल महिलांशी त्यांचे वाद होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे निर्मात्यांनी सांगितले. याला देखील किरण माने यांनी विरोध दर्शवला होता. तब्बल पंधरा दिवस हे प्रकरण सुरु होते.
किरण माने मालिकेतून गेल्यानंतर नव्या कलाकारासह मालिका सुरु झाली. किरण मानेही आपल्या कामाला लागले आणि काही काळासाठी हे प्रकरण शांत झाले. परंतु सध्या मालिकेचा टिआरपी घसरल्याचे कानावर येताच किरण माने यांनी पुन्हा आपल्या शब्दांचा आसूड चालवला आहे. 'मुलगी झाली हो' मालिकेची निर्मिती संस्था, काही कलाकार यांना कठोर शब्दात सुनावणारी पोस्ट त्यांनी केली आहे. मी अद्याप माघार घेतली नसल्याचेही ते यामध्ये म्हणाले आहेत. शिवाय मुलगी झाली हो या मालिकेचा टिआरपी घसरल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
ते म्हणातात... 'प्रेक्षक लै लै लै नादखुळा असत्यात भावांनो... मला काल वाढदिवसाची सगळ्यात मोठी गिफ्ट कुनी दिली आसंल, तर ती प्रेक्षकांनी ! जी गोष्ट भलेभले करू शकले न्हाईत, ती त्यांनी एका रट्ट्यात केली !! एका माजोरड्या प्राॅडक्शन हाऊसचा नक्षाच उतरवला. कटकारस्थान रचून मला बाजूला केल्यानंतर त्या सिरीयलचा टीआरपी असा काय घसरला की चॅनलनं ती अख्खी सिरीयलच 'प्राईम टाईम'मधून !!!
जी सिरीयल शहरी आणि ग्रामीण विभागात मिळून सलग दीड वर्ष बहुतांश एक नंबरवर आनि बर्याचदा पहिल्या तीन नंबरमध्ये असायची. ती तीन म्हैन्यात रसातळाला गेली. आता मे महिन्यापासून ती सिरीयल, अतिशय महत्त्वाच्या समजल्या जानार्या 'स्पेशल प्राईम टाईम'ला दिसनार नाय. फक्त तीन म्हैन्यात हे घडलं. ह्याला म्हन्त्यात 'पोएटिक जस्टिस'.
ही गोष्ट साधी नाय भावांनो. सर्वसामान्य जन्तेनं मनावर घेतलं तर काय होऊ शकतं याचं लै लै लै खतरनाक उदाहरन हाय. 'खरा न्याय' सर्वसामान्य जन्तेच्या दरबारात असतो. लोकप्रतिनिधी निवडतानाबी जन्तेनं अशीच ताकद दाखवली तर भल्याभल्यांना धोबीपछाड बसू शकते, हे इतिहासानं दाखवून दिलंय. "ये पब्लीक है ये सब जानती है" असं त्यो राजेश खन्ना डोळं मिचकावत म्हनत नाचायचा, ते काय खोटं न्हाय.
...कुनाला वाटत आसंल आता किरन माने नाचत आसंल, खुश झाला आसंल. नाय भावांनो. लढाई संपलेली नाय. मी कायदेशीर मार्गानं लढून तो न्यायबी मिळवनारच हाय. सुट्टी देनार नाय या भंगारांना. पन काही 'बिकाऊ' कलाकारांनी माझ्यावर जे आरोप केले, त्या सगळ्यांना प्रेक्षकांनीच सनसनीत, कचकटून थोबाडीत देऊन उत्तर दिलं याचं समाधान मात्र नक्की हाय.
कुनीतरी सांगीतलं की ती सिरीयल आता दुपारी दाखवनारेत. हे तर लै बेक्कार भावांनो. एखाद्या यशस्वी पोलीस इन्स्पेक्टरचं अचानक एक दिवस डिमोशन करून त्याला ट्रॅफिक हवालदारची ड्यूटी द्यावी तसं हाय हे ! यातही समाधान हे की जे बिचारे हातावर पोट असनारे असत्यात ते स्पाॅटबाॅय पासून मेकअपमन हेअरड्रेसर पर्यन्त त्यांचं पोट सुरू र्हानार. बाकी माजोरडे कलाकार कर्मानं मरनार. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी गत हुनार. जिथं फुलं वेचली तिथं गवर्या वेचायची वेळ येनार. असो. माझ्यावर कटकारस्थान रचून फायदा कुनाचा झाला आनि नुकसान कुनाचं झालं यावर एक चिंतन शिबीर घ्यावं त्यांनी.' या पोस्टनंतर किरण माने पुन्हा चर्चेत आले आहेत . आता या पोस्ट नंतर कोणता नवा वाद निर्माण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.