Kiran Mane: "ईडीचा सापळा फाडून वाघ सुटला, खरा जिगरबाज!"; किरण मानेंकडून या नेत्याचे तोंडभरुन कौतुक

Kiran Mane: किरण मानेंनी (Kiran Mane) नुकतीच एक पोस्ट शेअर करुन डी.के. शिवकुमार यांचे कौतुक केलं आहे.त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
D. K. Shivakumar, kiran mane
D. K. Shivakumar, kiran maneesakal
Updated on

Kiran Mane: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. डी.के. शिवकुमार यांच्याविरुद्ध 2018 मध्ये दाखल झालेला मनी लाँड्रिंगचा खटला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. अशताच आता किरण मानेंनी (Kiran Mane) नुकतीच एक पोस्ट शेअर करुन डी.के. शिवकुमार यांचे कौतुक केलं आहे. "द रियल हिरो डी.के.शिवकुमार!", असं म्हणत किरण मानेंनी डी.के.शिवकुमार यांचे कौतुक केलं आहे.

किरण मानेंची पोस्ट

किरण माने यांनी डी.के.शिवकुमार यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "ईडीचा सापळा फाडून वाघ सुटला ! खरा जिगरबाज. बघा रे, ईडीला घाबरून सत्ताधार्‍यांच्या वळचणीला गेलेल्या भेकडांनो. तुमच्यावर पुढच्या पिढ्या कुत्सितपणे हसणार आहेत. पण या डी.के. शिवकुमार सारख्या सच्चा लढवय्याला डोक्यावर घेऊन नाचणार आहेत.मेंदूत कोरून ठेवा. त्रास सहन करून स्वत्व टिकवणार्‍या स्वाभिमानी योद्ध्यांची नांवं इतिहास सुवर्णाक्षरात कोरतो. लाचारी पत्करून तात्पुरती पदं मिळवणार्‍या भेकडांना उकीरड्यावर फेकून देतो."

"काँग्रेस पक्षाचा कर्नाटकातला हा खंदा वीर. द रियल हिरो डी.के.शिवकुमार ! माजी उर्जामंत्री. ईडीची चौकशी झेलली छाताडावर. सत्ताधार्‍यांना भिक घातली नाही. मनी लाँड्रिंग केसेस झाल्या. बदनामी झाली. पन्नास दिवस तुरूंगवास सोसला. सहा वर्ष झुंज दिली आणि काल सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या केसेस 'बोगस' असल्याचे सांगत डी. के. शिवकुमार यांची निर्दोष मुक्तता केली!डी.कें.नी इतर कणाहीन नेत्यांप्रमाणे शेपूट घालून सत्तेत प्रवेश केला असता तर मुख्यमंत्रीही झाले असते. पण जनतेत छी थ्थू झाली असती. लोकांच्या नजरेतून कायमचे उतरले असते. पद आणि खोकी येतात तशी जातातही. पण 'इज्जत' आणि 'बाणेदारपणा' हजारो वर्ष तुमचं नाव टिकवतो!", असंही किरण मानेंनी कॅप्शनमध्ये लिहिलं.

पुढे पोस्टमध्ये किरण मानेंनी लिहिलं, "ईडीची धाड पडली की मिडीयावाल्यांच्या हिंस्त्र झुंडी बदनामी करायला मोकाट सोडली जातात. पण हा वाघ सुटून आल्यावर त्यांच्यावर खोट्या केसेस लादणार्‍या व्यवस्थेला जाब विचारणारा एकही 'माई का लाल' आज मिडीयात शिल्लक नाही. इतिहासातल्या सगळ्यात नीच स्तरावर आपल्या देशाची लोकशाही पोहोचली आहे याचा हा पुरावा. असो. डी.के, खरंतर तुमची हत्तीवरुन मिरवणूक काढावीशी वाटतीये. तुमच्या संघर्षाला लवून मुजरा घालावासा वाटतोय. एक लक्षात ठेवा, बदनामीचे घाव झेलूनही वर्चस्ववाद्यांपुढे न झुकलेल्या महामानवांना या देशाने कायम मनामेंदूत कोरून ठेवले आहे. आम्हाला त्यासाठी खोटे सिनेमे काढून कुणाची खोटी भलावण करायची गरज नाही. सुर्याला त्याच्या प्रकाशाची जाहिरात नाही करावी लागत. तुम्हाला तुमचा मान आणि आदर पुर्वीपेक्षा हजारपटींनी परत मिळणार. तुमच्या नावात 'शिव' आहे. बहुजनांचा आद्य महानायक!कडकडीत सलाम."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.