Kiran Mane: "लोक नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केला"; 'तो' व्हिडीओ शेअर करत किरण माने म्हणाले, "रोज नवं कपट... "

Eknath Shinde, Kiran Mane
Eknath Shinde, Kiran Mane
Updated on

Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी काही दिवसांपूर्वी विद्रोही साहित्य संमेलनाला हजेरी लावली. या संमेलनात त्यांनी भाषण देखील केलं. आता किरण माने यांनी साहित्य संमेलनातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते एक चिठ्ठी वाचताना दिसत आहे. ज्यामध्ये लिहिलंय, "लोक नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केला" किरण मानेंच्या या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

किरण मानेंनी शेअर केला व्हिडीओ

किरण माने यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणतात, "अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लोक नसल्यामुळे मुख्यमंत्री मोहोदयांनी दौरा रद्द केला आहे."त्यानंतर लोक टाळ्यांचा कडकडाट करतात. "अरं गाव सारा झटला, पण विद्रोही साहित्य संमेलनाचा रुबाब नाही हटला", असंही किरण माने हे या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

किरण माने यांनी व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "कारस्थानी माणसांनी साध्यासरळ माणसांचं जगणंच नासवलंय आजकाल. तुम्हाला सुखानं जगूच द्यायचं नाही असं ठरवलंय. रोज नवं कपट. कुठं बहुजनांच्या पोरांवर हल्ला कर तर कुठं पक्षांवर दरोडे घाल. कुठं जातीजातींत भांडणं लाव तर कुठं परखड बोलणार्‍यांची रोजीरोटी बंद कर. अशा सगळ्या वातावरणात व्यवस्थेच्या उरावर पाय रोवणारं विद्रोही साहित्य संमेलन यशस्वी झालं! सरकारी संमेलनाकडं पाठ फिरवून लोकांनी आपला 'राग' आणि 'कल' दाखवलेला आहे."

किरण माने यांनी काल आणखी एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचा बोर्ड दिसत आहे. या बोर्डचा फोटो शेअर करुन किरण माने यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "ठरवून बॅंड वाजवला अंमळनेरकरांनी, सरकारी साहित्य संमेलनाचा. त्याच्या लै कारणांपैकी हे सगळ्यात महत्त्वाचं कारण. अ.भा. साहित्य संमेलनात वर्चस्ववाद्यांनी बहुजनांच्या महामानवांची इज्जत कमी करण्याचा केलेला प्रयत्न बघा ! हे 'सांस्कृतिक राजकारण' गेली हजारो वर्ष हे लोक खेळत आलेले आहेत. बेट्याहो, महात्मा फुलेंची इज्जत अशा कुटील खोड्या करून कणभरबी कमी झाली नाही... उलट लोकांनीच तुमच्या अब्रूची लक्तरं काढली."

"अरे, महात्मा फुलेंसारख्या क्रांतीसुर्याच्या नांवाच्या बरोबरीनं, तुम्ही तुमच्या वळचणीतल्या लेखकांची नांव जोडता? शंभर जन्म घेतलेत तरी त्या महापुरूषाच्या पायाची धूळही होण्याची लायकी येणार नाही. फुलेंच्या साहित्यातनं समाज घडला, शिकला, क्रांती झाली. तुमी त्यांच्या बरोबरीनं जे नांव लिहीलंय, त्यांच्या लेखनानं तीन टक्के राहुद्या, अर्धा टक्क्यांच्या आयुष्यात केसभर तरी फरक पडलाय का? शोभणेंना तरी हे टायटल कसं मान्य झालं?? सद्सद्विवेकबुद्धी आहे की नाही???" मुख्यमंत्रीजी, शिंदेसरकार... तुम्ही सातारकर आहात. आपुलकीच्या नात्यानं सांगतो, तुम्हाला कुणीतरी याची कल्पना द्यायला पायजे होती. कितीबी झालं तरी पुर्वी तुमी बहुजनांच्या बाजूला होतात. आत्ता मी जे मानाचं शिवबंधन बांधलंय, तेच बंधन तुमीसुद्धा त्याच पवित्र 'मातोश्री'च्या वास्तूत बांधलंय. तुमचा अनादर नाही करणार मी. मला माहिती आहे, या वर्चस्ववाद्यांच्या असल्या कपटाबद्दल तुम्हाला काहीही माहिती नसणार. एवढंच लक्षात घ्या की फुले नसते तर तुम्ही आणि मी, आपण सगळे बहुजन आत्ता गुलामीत सडत असतो. शोभणे नसते तर फारफारतर मराठीत उत्तरायण ही साहित्यकृती नसती. ती नसली तरी समाजाला फारसा फरक पडणार नाही."

पुढे किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "शिंदेसाहेब, गैरसमज नसावा. शोभणे यांना लेखक म्हणून मी कमी लेखत नाही. 'वर्तमान' या कथासंग्रहातल्या अनेक कथांत मी स्वत:ला पाहिलं होतं... पण थेट महात्मा फुले??? कदापी नाही. 'तथागत बुद्ध ते संत तुकाराम' हे होऊ शकतं... 'महात्मा फुले ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर' हे होऊ शकतं... तसंच फारफार तर 'गो.नि. दांडेकर ते रविंद्र शोभणे' किंवा 'राम गणेश गडकरी ते रविंद्र शोभणे' असंही चाललं असतं.

"मुख्यमंत्रीजी, अ.भा. साहित्य संमेलनाच्या समारोपाला तुम्ही येणार हे माहिती असूनही मंडप रिकामा होता. तुम्ही आलाच नाहीत. मी असं कधीच म्हणणार नाही की, त्याचवेळी मला आणि प्रविणदादांना ऐकायला मंडप फुल्ल भरलावता म्हणजे आम्ही लै मोठे आहोत. तुम्ही मानानं, पदानं, अनुभवानं माझ्यापेक्षा मोठे आहात. तुम्हाला सांगतो, तुम्हालाबी या वर्चस्ववाद्यांनी कारस्थान करुन बळीचा बकरा बनवलं. लोक नाराज होणार हे त्यांनी ओळखलंवतं. त्यासाठीच ही काडी केलीवती.", असंही किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.