Kiran Mane: गेली काही दिवस किरण माने बरेच चर्चेत आहेत, सुरवातीला वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे किरण माने सध्या बिग बॉस मुळे चर्चेत आहे. मुंबईत सह ग्रामीण भागात त्यांची प्रचंड हवा आहे.
यंदाच्या बिग बॉसच्या चौथ्या पर्वात किरण माने सहभागी झाले होते. वयाच्या ५२ व्या वर्षी साताऱ्यातल्या बच्चन किरण मानेंनी जबरदस्त खेळ खेळून बिग बॉस मराठी ४ मध्ये टॉप ३ पर्यंत मजल मारली. प्रेक्षकांच्या मनात त्यांनी वेगळंच स्थान निर्माण केलं.
किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. आज पुन्हा एकदा त्यांनी बिग बॉसच्या खेळाची आठवण करून दिली आहे. बिग बॉस मधला एक किस्सा सांगत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
(Kiran Mane shared post about bigg boss marathi 4 danger zone and overall journey as finalist)
या पोस्ट मध्ये किरण माने यांनी बिग बॉस मराठी मधला एक प्रसंग शेयर केला आहे. टॉप पाच फायनालिस्ट निवडण्यात आले त्यावेळी किरण माने डेंजर झोन मध्ये असतानाचा हा व्हिडिओ आहे.
हा व्हिडिओ शेयर करत किरण माने म्हणतात, डेंजर झोनजवळ उभा होतो...
आयुष्यातला लै मोठ्ठा डेंजर झोन पार करून या खेळात आलोवतो. जिगरा लावून नव्वद दिवसांच्या वर झुंज दिलीवती. खंबीरपणे पाय रोवून उभा राहीलोवतो. आता या खेळातला हा 'डेंजर झोन' पार केला, तर आयुष्याच्या लढाईतला 'पोएटिक जस्टिस' मिळणार होता मला !''
''बिगबाॅसमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीची एकमेव आणि खात्रीशीर पावती म्हणजे 'फायनॅलिस्ट' हे शिखर गाठणं. बाकी सब झूठ. ''
हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
पुढे ते म्हणतात, ''...त्यामुळेच बिगबाॅसच्या दारातनं आत आल्यावर प्रत्येकाचं पहिलं स्वप्न असतं, 'टाॅप फाईव्ह'मध्ये पोहोचणं ! आयुष्यभर काळजात जपून ठेवावा असा 'फॅमिली विक'चा सोनेरी दिवस नुकताच अनुभवलेला असतो... आता 'फायनॅलिस्ट' म्हणून आपल्यावर कौतुकाचा वर्षाव करून, सन्मानाने दाखवल्या जाणार्या, अद्भूत प्रवासाची भावनिक 'रोलर कोस्टर' डोळे भरून पहायची असते... आणि शेवटचा ग्रॅंड फिनालेचा माहौल घरातल्या सोफ्यात सन्मानाने बसून साजरा करण्याची सोनेरी संधी मिळणार असते !!''
''या क्षणानं ते सग्ग्गळं मला दिलं. भरभरून दिलं. मनभरून दिलं. त्यामुळे ही आठवण कधीच विसरणार नाही, लब्यू बिगबाॅस... '' अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.