Kiran Mane: किरण माने आणि रोहित पवार यांची बारामतीत खास भेट, म्हणाले..

किरण माने यांची पोस्ट चर्चेत..
kiran mane shared post about cricket baramati meets mla rohit pawar
kiran mane shared post about cricket baramati meets mla rohit pawarsakal
Updated on

kiran mane meet rohit pawar in baramati: किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. मनोरंजन विश्वातील घडामोडी असो किंवा राजकीय हालचाली.. जे जे खटकेल त्यावर निर्भीडपणे टीका करणारा आणि पटेल त्याचे तोंड भरून कौतुक करणारा अभिनेता म्हणजे किरण माने अशी त्यांची ओळख आहे.

बिग बॉस मराठी नंतर त्यांच्या प्रसिद्धीत मोठी वाढ झाली असून त्यांचे चाहते आता महाराष्ट्रभर पसरले आहेत. लवकरच ते 'रावरंभा' या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात ते 'हकीमचाचा' ही भूमिका सकरणार आहेत.

याच चित्रपटाच्या निमित्ताने ते बारामतीत गेले होते. यावेळी त्यांची आणि आमदार रोहित पवार यांची भेटही झाली. त्याच संदर्भात किरण माने यांनी एक पोस्ट शेयर केली आहे, जी सध्या चर्चेत आहे.

(kiran mane shared post about cricket baramati meets mla rohit pawar)

kiran mane shared post about cricket baramati meets mla rohit pawar
Kushal Badrike: पण समोरची व्यक्ती त्या लायक नसेल तर?.. प्रेमाविषयी कुशल बद्रिके स्पष्टच बोलला..

किरण माने आणि पवार कुटुंबाचे जवळचे संबंध आहेत. जेव्हा किरण माने मालिकेतील वादात अडकले होते तेव्हा देखील त्यांनी सर्वप्रथम शरद पवार यांची भेट घेतली होती. ते बऱ्याचदा शरद पवार यांच्या विषयी भरभरून बोलत असतात.

विशेष म्हणजे किरण माने यांचा जन्म बारामतीचा आहे. त्यामुळे त्यांचे आणि बारामतीचे एक खास नाते आहे. आज ते बारामतीत एका क्रिकेट सामान्यासाठी गेले होते. यावेळी रोहित पवार यांची भेट देखील त्यांनी घेतली आणि क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. याच संदर्भात त्यांनी पोस्ट शेयर केली आहे.

किरण माने म्हणतात, ''जवळपास पंचवीस वर्षांनी मैदानात उतरून क्रिकेटची बॅट हातात घेतली ! लै भारी वाटलं. बारामतीच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये सेलिब्रिटी क्रिकेट मॅच झाली. मा. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या मॅचमध्ये आमची 'रावरंभा' सिनेमाची टीम सहभागी झाली.''

''सोबत सध्या ग्रामीण भागात धुमाकुळ घातलेल्या 'चांडाळ चौकडीच्या करामती' वेबसिरीजची टीम होती. मग काय क्रिकेटसोबत हास्याचेही चौकार, षटकार उडाले. धमाल. आम्हाला भेटण्यासाठी रोहीतदादा पवार आवर्जुन आले. एकंदरीत काल माझ्या जन्मगांवी येऊन पुन्हा लहानपणीची मजामस्ती अनुभवली... ताजातवाना झालो.'' अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.