Kiran Mane: कालचं सेलिब्रेशन हे फक्त सेलिब्रेशन नव्हतं तर 'विजयोत्सव' होता.. किरण मानेंची पोस्ट चर्चेत..

वाईच्या फार्महाऊसवर किरण मानेंचा जय्यत वाढदिवस.. पोस्ट करत म्हणाले.. कालचं सेलिब्रेशन..
Kiran Mane shared post about his birthday celebration in wai farmhouse with family friends
Kiran Mane shared post about his birthday celebration in wai farmhouse with family friendssakal
Updated on

kiran mane: किरण माने यांनी पोस्ट केली आणि चर्चा झाली नाही असे क्वचितच होते. गेल्या काही वर्षात किरण माने हे सर्वाधित चर्चेत राहिलेलं नाव आहे. कधी वादग्रस्त विषय, कधी मालिकेतील गोंधळ तर कधी आणखी काही.

बिग बॉस मराठी मुळे या नावाला अधिकच प्रसिद्धी मिळाली. सातारचा बच्चन घराघरात पोहोचला. ५२ वर्षांच्या किरण माने यांनी बिग बॉसच्या खेळात भल्याभल्याला धूळ चारली. त्यामुळे मुंबईत सह ग्रामीण भागात त्यांची प्रचंड हवा आहे.

ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. आज त्यांनी एक पोस्ट करत थेट स्वतःच्या वाढदिवसाचं कसं जंगी सेलिब्रेशन कसं झालं याविषयी ते बोलले आहेत.

(Kiran Mane shared post about his birthday celebration in wai farmhouse with family friends)

Kiran Mane shared post about his birthday celebration in wai farmhouse with family friends
Adipurush: ओम राऊतनं शेअर केला 'आदिपुरुष'मधील हनुमानाचा फर्स्ट लूक.. अन मराठमोळा अभिनेता भाव खाऊन गेला..

किरण माने म्हणतात, ''वाईजवळच्या फार्महाऊसवर माझ्या जीवातल्या गणगोतांचा काल मेळा जमला ! गप्पांची मैफल जमली, हसलो, खेळलो, नाचलो, गाणी गायली, खवय्येगिरी केली, रानात मनसोक्त हिंडलो... ''

''आपला वाढदिवस साजरा करताना, आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारी मानसं भवताली असावीत, यासारखं दुसरं सुख नाय. यात अजूनबी लै जण 'मिसिंग' हायेत, जे काही ना काही कारणानं येऊ शकले नाहीत. पण ही माणसं अशी हायेत भावांनो, जी कुठल्याबी वाईट प्रसंगात पयल्यांदा माझ्या पाठीशी उभी राहिली. माझ्या खांद्याला खांदा लावून लढली. माझी चूक हाय का नाय, मी दोषी हाय का नाय याची चौकशी नंतर...आधी मला भक्कम साथ देणं गरजेचं मानलं.''

''...काल महाराष्ट्रभरातनं असंख्य फोन्स आले. मेसेजेसचा खच पडला. अनेकांच्या पोस्टस् वाचून मन भरुन आलं. डोळ्यांच्या कडा पाणावल्या. लै जणांना केक घेऊन माझ्या घरी यायचं होतं. लै जणांनी त्यांच्या घरी सेलीब्रेशनची तयारी केलीवती. पण हा कार्यक्रम आधीच ठरल्यामुळं सगळ्यांना भेटू शकलो नाही.''

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

पुढे ते म्हणाले, ''तरी जाता-जाता, मला थांबवून, घाईगडबडीत का होईना पण माझे जवळचे मित्र धोंडी कारंडे, कल्पेश जगताप, रोहीत सावंत आणि मित्रमंडळींनी 'हंगर्स टाॅकीज'मध्ये सेलीब्रेट करायची संधी सोडली नाही ! गजानन वाडेकर-संदेश काटे या काॅलेजसाथींनी त्याच घाईत त्यांच्या ऑफिसमध्ये बर्थडे साजरा केला. दिपाली खोत, प्रियांका घोरपडे या माझ्या फॅन क्लबच्या फाऊंडर्सनी इस्लामपूरवरून केक पाठवला... अनेकांकडे जाता आलं नाही पण त्यांचं प्रेम माझ्या दृष्टीनं तितकंच मोलाचं हाय.''

''या अख्ख्या वर्षात लै काय-काय घडलं. प्रचंड उलथापालथी झाल्या. तुफानी झुंज देऊन विपरित परिस्थितीवर मात केली. तुम्ही साक्षीदार आहात सगळ्याचे. त्यामुळं कालचं सेलिब्रेशन हे फक्त सेलिब्रेशन नव्हतं तर 'विजयोत्सव' होता ! पुढचा काळ हा संघर्षाचं सोनं करायचा काळ आहे... त्यासाठी बळ देणारा हा दिवस होता. सगळ्या हितचिंतकांचे, फॅन्सचे, मित्रमंडळींचे लै लै लै आभार ! '' अशी पोस्ट माने यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.