Kiran Mane: 'या' कारणामुळे किरण मानेंनी दिला 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाला नकार...पोस्ट व्हायरल

किरण माने म्हणाताय, "मी एका क्षणात होकार दिला. फोन ठेवला आणि मन धावत भूतकाळात गेलं...पण.."
Kiran Mane
Kiran ManeEsakal
Updated on

Kiran Mane: मराठी मनोरंजन विश्वातल चर्चेतलं नाव म्हणजे किरण माने. मनोरंजन विश्वातल ते आघाडीचं नाव आहे. अनेक वर्षे मालिका, चित्रपट, नाटक करून त्यांनी नाव लौकिक मिळवला आहे. ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.

सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. बिग बॉस मराठी नंतर त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. किरण माने यांच्याकडे सध्या अनेक नवे प्रोजेक्ट आहेत. नुकतच त्यांनी ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाबद्दल पोस्ट केली आहे.

दरम्यान किरण माने यांच्या पोस्टचीही सोशल मिडियावर व्हायरल झाली. ते आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात की, 'एखादं प्रोजेक्ट तारखांच्या कारणासाठी हातातून गेल्याची चुटपूट लागून रहाते. बिगबॉस नंतर माझ्याकडे खूप कामे चालून आली याचा आनंद आहेच... आजही, आत्ता ही पोस्ट लिहुन लगेच मी कॅमेर्‍यापुढेच उभा रहाणार आहे... हे साध्य झालं फक्त त्या शो मुळेच ! पण... याआधी बिगबॉसच्या आणि शुटिंगच्या तारखा क्लॅश झाल्यानं एक छान सिनेमा सोडावा लागला होता.'

Kiran Mane
Priyanka Chaudhari : बिग बॉस फेम प्रियंका चहर चौधरीवर गुन्हा दाखल होणार ? या प्रसिद्ध मॉडेलने केलाय चोरीचा आरोप..

"'मुलगी झाली हो' चं शुटिंग करत होतो. अचानक केदार शिंदेचा फोन आला, "किरण, शाहीर साबळेंवर बायोपिक करतोय. त्यातल्या शाहिरांच्या सातारा वास्तव्यातल्या संवादांमध्ये अस्सल सातारी लहेजा, शब्द, बोली हे सगळं यावं यासाठी मला मदत करशील का? तयार असशील तर प्रतिमाताई, तू आणि मी दादरला जिप्सीमध्ये भेटूया. तुला स्क्रिनप्ले देतो." मी एका क्षणात होकार दिला. फोन ठेवला आणि मन धावत भूतकाळात गेलं... मायणीत..."

Kiran Mane
Ayush Sharma: ''रंग अन् वजनावरुन अर्पिताला हिणवतात', सलमानच्या मेव्हण्यान नेटकऱ्यांना सुनावलं

"...चौथी-पाचवीत होतो. वडिलांनी टेपरेकॉर्डर आणला. सोबत पाचसहा कॅसेटस् होत्या. त्यातल्या काही होत्या शाहीर साबळेंच्या ! 'बापाचा बाप', 'आबुरावाचं लगीन' अशी लोकनाट्यं त्यात होती. ती ऐकून याड लागलं. अक्षरश: तोंडपाठ केली ती. चारपाच मित्र जमवले.. त्यांनाही हा नाद लावला. मग काय, दर रविवारी आमच्या घरापुढच्या व्हरांड्याचं स्टेज बनवायचं आणि शाहिरांची लोकनाट्य सादर करायची ! आयुष्यातलं पहिलं 'स्टेज' , पहिल्या नाटकातला पहिला अभिनय, पहिला प्रेक्षक, अभिनयाचं पहिलंवहिलं कौतुक...हे सगळं सगळं अनुभवायला शाहीरांची ती लोकनाट्यं कारणीभूत ठरली."

"अकरावीला कॉलेजसाठी सातार्‍यात आल्यावर जेव्हा-जेव्हा शाहीरांचा कार्यक्रम सातारला असेल तेव्हा कार्यक्रमाच्या आधीच ते जिथं मुक्कामाला असत तिथं पोहोचायचो. तिथं जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवून आशिर्वाद घ्यायचो. लै भारी वाटायचं. मी आजही अभिमानानं सांगतो की, आयुष्यातला पहिला ऑटोग्राफ मी शाहीर साबळेंचा घेतलाय !"

Kiran Mane
Shiv Thakare: वीणा नंतर शिव ठाकरेला मिळाली त्याची 'ड्रीम गर्ल'! 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट?

"...'महाराष्ट्र शाहीर'च्या प्रोसेसमध्ये केदारनं काही काळ का होईना सहभागी करून घेणं, हे माझ्यासाठी किती आनंद देणारं असेल, किती मोलाचं असेल हे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. खरंतर केदार मला या सिनेमात एक छान भुमिकाही देणार होता, पण शुटिंगच्या तारखा आणि बिग बॉस एकाच वेळी आल्यामुळे ती संधी हुकली.

पण या निमित्तानं मी ज्यांना गुरूस्थानी मानतो अशा शाहीर साबळेंना सलाम करण्याची छोटीशी का होईना संधी मिळाली. सलाम शाहीर, त्रिवार सलाम !!!"

महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित अवघ्या काहीच दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा टिझर, ट्रेलर आणि गाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. महाराष्ट्र शाहीर सिनेमा २८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.