Kiran Mane: सिनेमा प्रसिध्दी देतो, मालिका पैसा, पण नाटक.. किरण माने थेटच बोलले..

जागतिक रंगभूमी दिनी किरण मानेच्या पोस्टनं वेधलं लक्ष..
Kiran Mane shared post about natak drama theatre day jagatik rangbhumi din
Kiran Mane shared post about natak drama theatre day jagatik rangbhumi din sakal
Updated on

आज जागतिक रंगभूमी दिवस. दरवर्षी २७ मार्च रोजी हा दिवस जगभरात जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. कलाकारांसाठी या दिवसाचे प्रचंड महत्व आहे. नाटक, संगीत, नृत्य अशा विविध कला सादर करणारे कलाकार या दिवशी आवर्जून आपल्या भावना व्यक्त करत, कुणी सादरीकरण करतं. अशाच काहीशा भावना अभिनेते किरण माने यांनी आजच्या दिवशी व्यक्त केल्या आहेत.

किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. ते आज मनोरंजन विश्वात भक्कम उभे आहेत. त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात नाटकातूनच केली. आज त्यांना प्रसिद्धी मिळाली असली तरी त्यामागे सगळे श्रेय नाटकाचे आहे.

म्हणूनच जागतिक रंगभूमी दिली त्यांनी काही फोटो शेयर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोबत एक छान कॅप्शनही दिले आहे.

(Kiran Mane shared post about natak drama theatre day jagatik rangbhumi din )

Kiran Mane shared post about natak drama theatre day jagatik rangbhumi din
Sunidhi Chauhan: बॉलीवुड गायिका सुनिधी चौहानने पहिल्यांदाच गायलं मराठी मालिकेचं शीर्षकगीत!

या पोस्टमध्ये किरण माने म्हणतात की, सिनेमा तुम्हाला प्रसिद्धी देतो. टीव्ही मालिका तुम्हाला पैसा देते.. नाटक तुमचं व्यक्तीमत्त्व समृद्ध करतं !"

पुढे ते म्हणतात, ''काल एका पत्रकारमित्राचा फोन आला, "उद्या जागतिक रंगभूमी दिन. रंगभूमीनं तुम्हाला काय दिलं?"
'रंगभूमीनं काय दिलं?'
- रंगभूमीनं काय दिलं नाही?
रंगभूमीनं ओळख दिली..
आत्मविश्वास दिला..
भवतालाचं, समाजाचं भान दिलं..
भाषेवरचं प्रभुत्व दिलं, त्याबरोबरच 'बोली'चा गोडवाही दिला..
उच्च अभिरूचीचं वरदान दिलं...
सांस्कृतीक श्रीमंती दिली..

''रंगभूमीवर जगलेल्या प्रत्येक क्षणानं मला अपार आनंद दिला.. कल्पनेपलीकडचं समाधान दिलं ! अजून काय पाहिजे? .. त्यामुळे सर्व रंगकर्मींना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ! अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या पोस्ट मध्ये किरण माने यांनी महत्वाच्या भूमिका केलेल्या काही नाटकांचे फोटो शेयर केले आहेत. यामध्ये प्रशांत दामले, अमिता खोपकर, योगिनी चौक, अमृता सुभाष, वंदना गुप्ते, अशोक सराफ, स्मिता तळवलकर, अनीता दाते असे दिग्गज कलाकार आपल्याला किरण माने यांच्यासोबत पाहायला मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.