Kiran Mane: आंबेडकर कुटुंबीयांनी असं माझ्यात काय पाहिलं.. 'तो' पुरस्कार जाहीर होताच किरण मानेंची पोस्ट..

माणसामाणसात फूट पाडू पहाणार्‍या समाजात.. पुरस्काराच्या निमित्ताने किरण माने स्पष्टच बोलले..
kiran mane shared post about samyak award given by prakash ambedkar birthday jai bhim
kiran mane shared post about samyak award given by prakash ambedkar birthday jai bhim sakal
Updated on

kiran mane: किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. मनोरंजन विश्वातील घडामोडी असो किंवा राजकीय हालचाली.. जे जे खटकेल त्यावर निर्भीडपणे टीका करणारा आणि पटेल त्याचे तोंड भरून कौतुक करणारा अभिनेता म्हणजे किरण माने अशी त्यांची ओळख आहे.

बिग बॉस मराठी नंतर त्यांच्या प्रसिद्धीत मोठी वाढ झाली असून त्यांचे चाहते आता महाराष्ट्रभर पसरले आहेत. लवकरच ते 'रावरंभा' या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात ते 'हकीमचाचा' ही भूमिका सकरणार आहेत.

ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून फुले शाहू आंबडेकर करांचे विचार तर पोहोचवत असतात. नुकतीच त्यांनी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यांच्या सामाजिक योगदानामुळे त्यांना एक मोठा पुरस्कार जाहीर झाला आहे. याच निमित्ताने त्यांनी एक सणसणीत पोस्ट लिहिली आहे.

(kiran mane shared post about samyak award given by prakash ambedkar birthday jai bhim)

kiran mane shared post about samyak award given by prakash ambedkar birthday jai bhim
Unlock Zindagi: नऊ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा 'अनलॉक जिंदगी' या दिवशी होतोय प्रदर्शित

किरण माने (kiran mane) यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबियांकडून दिला जाणारा ''सम्यक पुरस्कार'' जाहीर झाला आहे. याच निमित्ताने त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे.

किरण माने लिहितात की, ''ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिला जाणारा 'सम्यक पुरस्कार' यावर्षी मला जाहीर झाला आहे. १० मे रोजी पुण्यात कष्टकर्‍यांचे कैवारी मा. डाॅ. बाबा आढाव यांच्या हस्ते हा पुरस्कार मला दिला जाणार आहे.''

''पुरस्कार जाहीर झाल्याचा फोन आला आणि डोळ्यांत पाणी तरळलं. वाटलं, मी एवढ्या मोठ्या सन्मानासाठी पात्र आहे का? बर्‍याचजणांना हे ही वाटेल की याचं काय एवढं मोठं काम? आंबेडकर कुटूंबीय आणि पुरस्कार समितीनं असं काय पाहिलं असावं माझ्यात?''

फुले आंबेडकर जयंतीवेळी गांवोगांवी जाऊन व्याख्यानं देणं... बुद्ध जयंती-तुकाराम बीजेचं वगैरे निमित्त साधुन बुद्ध-तुकाराम यांच्यातल्या संबंधांवर गांवखेड्यातल्या बुद्धविहारात जाउन भाषणं देणं... हे सगळं शुटिंगमधून वेळ मिळेल तसं. इतरवेळी अधूनमधून फेसबुक पोस्टमधून शिव-शाहू-फुले-आंबेडकरी आणि तुकोबांच्या विचारांचा प्रसार करणं... यापलीकडं फार मोठ्ठं योगदान नाही माझं.''

हेही वाचा: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

''दुसरं म्हणजे हे सगळं मी कुठल्या मानसन्मानासाठी नाही करत. माझा आनंद आहे यात. मला अभिनयातून जेवढं समाधान मिळतं तेवढंच या गोष्टींतूनही मिळतं. हे सगळं मी 'स्वान्तसुखाय' करतो.''

''...याची दखल थेट आंबेडकर कुटूंबियांनी घेणं हे माझ्या काळजाला स्पर्श करून गेलंय. कदाचित माणसामाणसात फूट पाडू पहाणार्‍या आजच्या भवतालात, रंगमंचावर-पडद्यावर विविध भुमिका साकारणार्‍या एका अभिनेत्यानं, सामाजिक 'भुमिका घेणं' हे त्यांना महत्त्वाचं वाटलं असावं. केवळ त्या भावनेचा आदर म्हणून मी हा पुरस्कार स्विकारणार आहे.''

''मी लहान असताना माझे वडील मला डाॅ.बाबा आढावांची भाषणं ऐकायला मायणीहून सातारला घेऊन जायचे. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मला मिळणार आहे, हे माझ्यासाठी किती मोलाचं आहे ते मी शब्दांत नाही सांगू शकत. आत्ता हे लिहीतानाही हात थरथरताहेत.''

''माझ्यावर मोलाचे संस्कार करणार्‍या डाॅ.आ.ह.साळुंखे तात्यांचा माझ्या जडणघडणीत अतिशय मोलाचा वाटा आहे. सगळं श्रेय त्यांचं आहे. मी निमित्तमात्र. धन्यवाद बाळासाहेब... धन्यवाद पुरस्कार समिती. जयभीम.'' अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.