सध्या मराठी सिनेमा हाच एक चर्चेचा विषय झालेला आहे. कारण एकीकडे 'महाराष्ट्र शाहीर' ंए कोट्यावधींचा गल्ला कमावला आहे तर दुसरीकडे 'TDM' सारखा चित्रपट शो ं मिळाल्याने बंद करावा लागला. त्यामुळे मराठी चित्रपटांविषयी सध्या अनेक चर्चा सुरू आहेत.
ग्रामीण आणि मातीतल्या अशायाला प्रस्थापितांकडून डावलले जात असल्याचा सुरू उमटत आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी 'तेंडल्या' हा चित्रपट प्रदर्शित झाला. ग्रामीण जीवनातलं भावविश्व रेखटणारा हा चित्रपट वास्तवाला हात घालणारा आहे. पण पुन्हा व्यावसायिक पातळीवर त्याला किती यश मिळेल हे अद्याप सांगणे कठीण आहे.
म्हणून हा चित्रपट पाहून प्रेक्षकांना आवाहन करणारी एक पोस्ट किरण माने यांनी लिहिली आहे. यात केवळ त्यांनी चित्रपटाचे कौतुक केले नाही तर मराठी चित्रपट सृष्टीतील राजकारणाचे वाभाडे काढले आहेत.
(kiran mane shared post about tendlya marathi film to support and reveal truth of marathi director producer industry)
किरण माने यांनी 'तेंडल्या' चित्रपट पाहून एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात लिहिले आहे की, ''सिनेमा अस्स्सा असतो भावा ! नादखुळा !! मराठी सिनेमाला 'फॅंड्री'नं ज्या उंचीवर नेउन ठेवलंवतं, तिथून आणखी सात मजले वर नेऊन ठेवलाय तो 'तेंडल्या'नं. मी हे विधान अतिशय जबाबदारीनं करतोय. सचिन जाधव-नचिकेत वाईकर ही दिग्दर्शक ही जोडी येत्या काळात मराठी सिनेमाला 'सोन्याचे दिस' दाखवण्याची ताकद असणारी आहे, यात शंका नाही.''
''..लै दिवस मी एका प्रश्नावर मनापास्नं विचार करत होतो. मोठमोठ्या नांववाल्या दिग्दर्शकांशी यावर वादबी घातलाय : 'उत्तम आणि लोकप्रिय मराठी सिनेमा बनवायला काय लागतं?''
''...बोगस कथानकावर प्रचंड पैसा ओतून प्रेक्षकांवर दणादणा प्रसिद्धीचा मारा करणारा निर्माता? असा 'बकरा' गळाला लागलाय म्हणून अर्धवट लिहीलेल्या स्क्रिप्टवर घाईघाईत सिनेमा बनवणारा दिग्दर्शक? सुमार अभिनय असला तरी मोठ्ठं नांव असलेले 'स्टार्स'???''
की..
''गुंतवुन टाकणारं, काळजाला हात घालणारं, मनामेंदूत घर करणारं कथानक... नांव नसलेले पण जीव ओतून काम करणारे प्रतिभावान अभिनेते... वेळ घेऊन कथा-पटकथेतील बारकाव्यांवर नीट काम करून, अभ्यास करून पडद्यावर नितांतसुंदर चित्र साकारणारा दिग्दर्शक???''
हेही वाचा: Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
पुढे ते म्हणतात, ''मराठीत पहिला पर्याय असलेल्या सिनेमांचा सुळसुळाट आहे गेली कित्येक वर्ष... दुसरा पर्याय मात्र दुर्मिळ. त्यासाठी कुणी निर्माता तयार नसतो. बजेट कमी, अनोळखी कलाकार वगैरेंमुळे त्या सिनेमाची पुरेशी प्रसिद्धी होत नाही. त्यामुळे प्रेक्षक येत नाहीत, असं त्यांचं मत आहे. वाईट वाटायचं. उत्तम कथेची उत्तम मांडणी आणि नवोदितांचा तगडा अभिनय असलेला सिनेमा चालायला हवा असं कळकळीनं वाटायचं.''
''अशातच आज 'तेंडल्या' पाहिला ! काय सांगू गड्याहो... 'आनंदाचे डोही आनंद तरंग' अशी अवस्था झाली !! तळमळीनं वाटलं की सगळ्या मराठी मुलखातल्या सिनेमाप्रेमींना लाऊडस्पीकरवर ओरडून सांगावं की भावाबहिणींनो, 'तेंडल्या' नक्की बघा... आवर्जुन बघा... शो कुठे आहेत ते शोधुन काढा... लांब असेल तर वाट वाकडी करून जा पण बघाच... मनमुराद हसाल, रडाल, टाळ्या वाजवाल, हरवून जाल... आणि थेटरातनं बाहेर पडताना लाखमोलाचं कायतरी घेऊनबी याल...''
''आपलं हरवलेलं हवंहवंसं, लोभस, रंगीबेरंगी बालपण परत अनुभवावं असं प्रत्येकाला वाटतं... ती संधी देणारा 'तेंडल्या' हा भन्नाट, जबराट, नादखुळा पिच्चर आहे. मराठीत एक अशी कलाकृती आलीय, जी फॅमिलीला सोबत घेऊन, पैसे खर्चून, थिएटरमध्ये जाऊन, स्वत:भोवती अंधार करून, एका रम्य विश्वात हरवून जाण्याचा आनंद लुटत पहा..जिच्यातनं स्वप्नं पूर्ण करण्यासाठीचं वेडेपण कायमचं काळजात कोरून घ्या... मराठीतली सुमारांची सद्दी संपवायला लै टॅलेंटेड पोरं सज्ज आहेत, त्यांना बळ द्या.'' अशा शब्दात किरण माने यांनी सर्वांचा समाचार घेतला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.