Kiran Mane on Satara News: किरण माने यांनी बिग बॉस मराठी ४ मधुन स्वतःचं अनोखं स्थान निर्माण केलं. किरण माने यांनी वयाच्या ५२ व्या वर्षी बिग बॉसमधुन दमदार खेळ केला.
किरण माने बिग बॉसमध्ये सहभागी होण्याआधी मुलगी झाली हो मालिकेच्या वादात अडकले होते. त्यांनी पुढे चॅनलविरोधात मानहानीची केस सुद्धा ठोकली होती. अशातच किरण मानेंनी त्यांचं जन्मस्थान साताऱ्याबद्दल खास पोस्ट केलीय.
(kiran mane special post on satara city ajinkyatara news)
किरण माने लिहीतात ...लोकं म्हन्त्यात "सारखं शुटिंगसाठी मुंबई-सातारा-मुंबई.. कशाला यवढी दगदग करत असता? मुंबईत शिफ्ट व्हा की फॅमिली घेऊन." खरंतर मुंबै लै आवडती. नाटका-सिनेमात रमनारी ! जगातलं हे एकमेव शहर असं आसंल,
जिथं रोज, कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्यातरी नाटकाचा प्रयोग अस्तो. कुठं ना कुठं, कस्लं ना कस्लंतरी शुटिंग सुरू आस्तं. कस्लं भारीय हे !
माने पुढे लिहीतात... सातारा म्हंजी काळजाचा तुकडा हाय आपल्या. गेली दहा वर्ष मी नाटक-सिनेमा सिरीयलनिमित्तानं हळूहळू मुंबैत बिझी होत गेलो.
पन शुटिंग-नाटकाचं प्रयोग करून परत सातारला येताना लिंबखिंडीतनं सातार्याकडं बघितल्यावर जे वाटतं मला, ते शब्दांत नाय सांगू शकत..
माने पुढे अजिंक्यतारा किल्लाबद्दल लिहीतात ...माझ्या घराशेजारी भक्कम पाय रोवून माझ्या पाठीशी उभा असलेला अजिंक्यतारा.. म्हैन्यातनं एकदातरी हाक मारून बोलवून घेनारं कास पठार..
आस्तीक असो नायतर नास्तिक, अस्सल सातारकर एकातरी श्रावनी सोमवारी यवतेश्वरला आनि दिवाळीत पयल्या अंघोळीला खिंडीतल्या गनपतीला जातोच..
कधीमधी सज्जनगडावर जाऊन तिथल्या महाप्रसादाची चव चाखतोच ! पावसाळ्यातल्या ठोसेघरपुढं स्काॅटलंड आन युरोप झक मारंल राजेहो !!
कधी मन उदास झालं तर माहूलीला कृष्ना-वेन्नेच्या संगमावर जाऊन वहात्या पान्याकडं एकटक बघत बसायचं. मूड फ्रेश असला तर कन्हेर डॅमवर चक्कर मारायची... काय-काय सांगू !
माने शेवटी लिहीतात.. कधी वरच्या रोडवरनं राजवाड्यावर जाऊन खालच्या रोडवर्न परत पोवई नाक्यावर आलं तर आख्खं सातारा भेटतं... दोस्तलोकं हाक मारत्यात "ऐ किरन्या भावा...लै मोट्टा ॲक्टर झालास.. आमाला इसारला न्हायस ना? ये की घरी रैवारी मटन खायाला."
बास. आजून काय पायजे? मुंबै बापासारखी असली तरी सातारा आईसारखी माया करतं माझ्यावर... आपल्या आईला सोडुन कधी कुनी जातं का?
म्हनूनच, मुंबैत काम करायला शंभर हत्तींचं बळ देनारा माझा सातारा आपन कधीच सोडनार नाय गड्या... अशी पोस्ट किरण मानेंनी लिहीलीय.
किरण माने अलीकडेच रावरंभा या मराठी सिनेमात झळकले होते. याशिवाय माने लवकरच सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची या मालिकेतुन भेटीला येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.