Kiran Mane: तुम्ही-आम्ही काय मेलो नव्हतो.. आंबेडकरांच्या चवदार तळे सत्याग्रहानिमित्त किरण मानेंची खास पोस्ट

किरण माने यांनी नुकतंच महाडच्या चवदार तळे सत्याग्रहानिमित्त एक खास पोस्ट केलीय
kiran mane, kiran mane news, babasaheb ambedkar chavdar tale satyagrah
kiran mane, kiran mane news, babasaheb ambedkar chavdar tale satyagrahSAKAL
Updated on

Kiran Mane News: बिग बॉस मराठी ४ फेम किरण माने त्यांच्या विविध पोस्ट्स निमित्ताने सोशल मीडियावर चर्चेत असतात.

किरण माने नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड मध्ये जो चवदार तळे सत्याग्रह केला होता त्याविषयी खास पोस्ट सोशल मीडियावर शेयर केलीय. किरण माने यांनी नुकतंच महाडच्या चवदार तळे सत्याग्रहानिमित्त एक खास पोस्ट केलीय.

(kiran mane viral post on dr. babasaheb ambedkar mahad kranti din)

kiran mane, kiran mane news, babasaheb ambedkar chavdar tale satyagrah
Riva Arora: गाडी घेतलीस पण लायसन्स? उरी फेम १३ वर्षांच्या अभिनेत्रीने तब्बल ४४ लाखांची गाडी घेतली आणि...

किरण माने लिहितात.."...चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने आम्ही अमर होऊ, अशातला भाग नाही...आजपर्यन्त चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो, तर तुम्ही-आम्ही काय मेलो नव्हतो.

त्यामुळे चवदार तळ्यावर केवळ पाणी पिण्यासाठी जायचे नसून, इतरांप्रमाणे आम्हीही या समाजातील माणसे आहोत, हे सिद्ध करण्यासाठी !" ...चवदार तळे, महाड !

अशी पोस्ट लिहून किरण माने यांनी महाडच्या चवदार तळ्याजवळचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत किरण मानेंचा मित्रही दिसतोय.

kiran mane, kiran mane news, babasaheb ambedkar chavdar tale satyagrah
Rohit Shetty: रोहित शेट्टीचा पहिला मराठी सिनेमा, श्रेयस तळपदे - जितेंद्र जोशी - वनिता खरात अशी तगडी स्टारकास्ट

काय होता चवदार तळे सत्याग्रह:

'महाड सत्याग्रह' हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता.

यामुळेच २० मार्च हा दिवस "सामाजिक सबलीकरण दिन" म्हणून भारतात साजरा केला जातो. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली हि पहिली सामायिक कृती होती.

या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते.

गेली काही दिवस बिग बॉस फेम किरण माने यांची चर्चा जोरात आहे. बिग बॉस मराठी ४ (Bigg Boss Marathi 4) मुळे किरण माने हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं.

किरण माने त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे, त्यांच्या परखड शैलीमुळे बिग बॉस मराठी ४ मध्ये सर्वात चर्चेत राहिलेले स्पर्धक होते.

किरण माने आणखी एकदा चर्चेत आले ते म्हणजे राखी सावंत सोबतच्या मैत्रीमुळे. किरण माने बिग बॉस मराठी ४ नंतर रावरंभा या मराठी सिनेमात झळकणार आहेत. याशिवाय महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमात किरण माने झळकणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()