शिल्पा शेट्टी सध्या आपल्या कामात प्रचंड व्यस्त आहे. अर्थात ती सिनेमांपेक्षा सध्या बिझी दिसते ती रिअॅलिटी शोजची जज म्हणून तर कधी मोठमोठाल्या शोज मध्ये परफॉर्मन्स देताना. बरं,शिल्पाची ओळख परफेक्ट 'फॅशन स्टायलिस्ट' म्हणूनही आहे. कुठल्याही शो चं 'जज' म्हणून काम पाहताना किंवा शो मध्ये परफॉर्मन्स देताना तिथे चोख काम करण्यापेक्षा चोख वावरणं,उत्तम दिसणं या गोष्टींना जास्त महत्त्व असल्याचंच आजकाल दिसून येतं. शिल्पा शेट्टी तर यात बाजीच मारून जाते. तिच्या बाबतीत तर असंही ऐकायला मिळालंय की प्रत्येक परफॉर्मन्स नंतर 'टचअप'साठी मेकअप आर्टिस्टला ब्रेक घेऊन बोलावते. आणि याचा भुर्दंड भरावा लागतोय तो किरण खेर,बादशहा आणि मनोश मुताशीर या इतर जजेसना शूटसाठी जास्तीचा वेळ देऊन. ू
'इंडियाज गॉट टॅलेट' या सोनी टि.व्ही वरील कार्यक्रमाचे अभिनेत्री किरण खेर,गीतकार मनोज मुताशीर,रॅपर बादशहाही शिल्पा शेट्टीसोबत जज म्हणून काम पाहत आहेत. या सेटवर याआधीही बादशहामुळे किरण खेर या भडकल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. तेव्हा किरण खेर बादशहाला ओरडतानाचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला होता. आता पुन्हा शिल्पा शेट्टीवर एका कारणामुळे किरण खेर पंजाबीतनं ओरडल्याचा व्हिडीओ समोर येतोय. यात शिल्पाच्या 'टचअप' वरनं त्या बोलत आहेत. तर शिल्पानं जे काही गुलाबी रंगाचं सगळं मॅचिंग सेंटर आपल्या फॅशनच्या माध्यमातनं उभं केलेलं होतं त्याला जजेसनीही वेगवेगळी नावं देऊन तिची खिल्ली उडवली. गीतकार मनोज मुताशीरनं तर तिचं 'पिंकी शेट्टी' म्हणून नामकरणही करून टाकलं. तर बादशहा तिला म्हणाला 'दुधवाला रुहआफ्जा'.
आता सेटवर जजेसमध्ये रंगणारे वाद हे काही नवीन नाहीत. तर कधीकधी शो च्या टीआरपी साठीही हे सगळं घडवून आणलं जातं. 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या सेटवर मात्र मजेशीर गोष्टींना वादाच्या मुद्दयांचा तडका देऊन छान प्रमोशनल व्हिडीओ बनवले जातात. जे शिल्पा शेट्टी नेहमीच आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करीत असते. आता यावेळी ती स्वतःच या मजेशीर वादाचं निमित्त ठरलीय. आणि शिल्पानं स्वतः हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.