Kishor Kadam : 'तेव्हा समग्र स्त्रीत्व साक्षी', सौमित्रची कविता व्हायरल

अभिनेते किशोर कदम यांनी कवितेच्या माध्यमातून मार्मिक भाष्य केलं आहे.
Sakshi Malik's retirement from wrestling
Sakshi Malik's retirement from wrestlingEsakal

Kishor Kadam On Sakshi Malik's retirement from wrestling: गेल्या काही दिवसांपासून भारतीय कुस्ती महासंघ चर्चेत आहे. भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी संजयसिंह या ब्रिजभूषण शरणसिंह यांच्या निकटवर्तीयांची निवड झाल्याने पुन्हा त्यांचेच वर्चस्व निवडणुकीत कायम राहिले. परिणामी कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी संजय सिंग, भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय, WFI अध्यक्ष झाल्याच्या निषेधार्थ तिची निवृत्ती जाहीर केली.

Sakshi Malik's retirement from wrestling
Ram Charan - CM Shinde: सुपरस्टार राम चरणने घेतली एकनाथ शिंदेंची भेट, मुख्यमंत्र्यांनी असं केलं स्वागत

या राजकाराणामुळे निराश झालेली ऑलिंपिक, आशियाई व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पदकविजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीला रामराम करण्याचा निर्णय घेतला. नव्या कार्यकारिणीच्या उपस्थितीत मी कुस्ती खेळणार नाही, असे तिने पत्रकार परिषद घेत स्पष्टपणे सांगितले.

Sakshi Malik's retirement from wrestling
Dunki Box Office: शाहरुखच्या 'डंकी'चा डंका वाजलाच नाय! प्रभासच्या सालारसमोर काही केल्या टिकेना! दुसऱ्या दिवशी किती कोटी कमावले?

सध्या हे प्रकरण खुपच तापले आहे. सर्वच क्षेत्रातील लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान या मुद्द्यावर प्रसिद्ध अभिनेते कवी सौमित्र अर्थात किशोर कदम यांनी कवितेच्या माध्यमातून मार्मिक भाष्य केलं आहे.

प्रदूषित चौक.

लक्ष्मी सरस्वती

तुळजाई रख्माई

सार्या सार्याच देवी

आपापली देवळं

नि मुर्त्या सोडून

बाहेर पडून शेवटी

एकत्र येऊन

उभ्या राहिल्या

प्रदूषित हवेच्या

स्वाभिमान चौकात

तेंव्हा समग्र स्त्रीत्व

साक्षी होत

म्हणू शकलं

हतबलपणे

कसे बसे

दोनच शब्द

आय क्विट

ही

तेंव्हाची गोष्ट ….

सौमित्र.

या कवितेसोबतच त्यांनी साक्षी मलिकेच्या बूटाचा फोटो शेयर केला आहे. सध्या सौमित्र यांची ही कविता सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहे. अनेकांनी त्याच्या कवितेचे कौतुक केले आहे तर अनेकांनी सरकारवर टीका केली आहे.

या पोस्टच्या कमेंटमध्ये एकाने लिहिले की, 'या बुटांची किंमत काही हजारात असेल. पण आता ते मौल्यवान ठरायला हवेत, पुढील राजकीय उलथापालथ करण्याकरिता' तर दुसऱ्याने लिहिले, हे जोडे आपणा सर्वांना साक्षीने मोजून मारले आहेत . महिला सबलीकरण, सक्षमीकरणाच्या बाता मारता काय ? घ्या!अशा कमेंट करत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Sakshi Malik's retirement from wrestling
Salaar Box Office Collection Day 1: सालारनं बॉक्स ऑफिस हादरवलं! पहिल्याच दिवशी रचला इतिहास; जाणून घ्या कलेक्शन

अभिनेते किशोर कदम हे सौमित्र या टोपण नावाने कवीता लिहीतात. वेगवेगळ्या सामाजीक मुद्द्यावरूल त्यांच्या कवीता प्रसिद्ध आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com