"हिरोसोबत रात्र घालवावी लागेल"; किश्वरने सांगितला धक्कादायक अनुभव

अभिनेता आणि निर्माते हे खूप नामवंत असल्याचा खुलासा किश्वरने केला.
Kishwer Merchant
Kishwer Merchant
Updated on

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री किश्वर मर्चंटने Kishwer Merchant तिच्यासोबत घडलेला कास्टिंग काऊचचा casting couch धक्कादायक प्रसंग सांगितला. भूमिका मिळवण्यासाठी मला अभिनेत्यासोबत रात्र घालवावी लागेल असं सांगण्यात आलं होतं. त्या चित्रपटातील हिरो, निर्माते हे खूप नामवंत होते, असा खुलासा किश्वरने केला. (Kishwer Merchant on casting couch experience I was told that I will have to sleep with the hero)

याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किश्वर म्हणाली, "मी एका मिटींगसाठी गेले होते, तेव्हा ही घटना घडली. माझी आई माझ्यासोबत होती. मला हिरोसोबत रात्र घालवावी लागेल असं मला सांगण्यात आलं होतं. मी अत्यंत नम्रपणे ती ऑफर नाकारली आणि तिथून निघाले. इंडस्ट्रीत अशा घटना खूप घडतात किंवा हे खूपच सामान्य आहे असं मी नाही म्हणणार. इंडस्ट्री बदनाम आहे पण प्रत्येक इंडस्ट्रीत अशा घटना घडतात." या घटनेचा पुढील करिअरवर कोणताच परिणाम होऊ दिला नसल्याचं तिने पुढे स्पष्ट केलं.

Kishwer Merchant
Indian Idol 12: टीमचा मोठा निर्णय; सर्व स्पर्धकांची घरवापसी

"मी टीव्ही क्षेत्राकडे अधिक वळले. मला छोट्या पडद्यावर चांगलं काम मिळू लागलं होतं. माझं करिअर उत्तम झालं असं मला वाटतं. टीव्हीमुळे मला अधिक प्रसिद्धी मिळाली. चित्रपटांमधील छोट्या भूमिकांना फार महत्त्व नसतं असं मला वाटतं", असं ती म्हणाली.

किश्वरने प्रेग्नंट असल्याची गोड बातमी मार्च महिन्यात दिली होती. गरोदरपणातील फोटोसुद्धा तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

Kishwer Merchant
TRP न मिळाल्याने फ्लॉप झालेल्या मराठी मालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()