Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमानच्या 'जी रहे थे हम' या रोमँटिक गाण्याचा टीझर रिलीज, पूजा हेगडेसोबत दिसली जबरदस्त केमिस्ट्री

अभिनेता सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातील 'जी रहे थे हम' या लेटेस्ट गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे.
salman khan and pooja hegde
salman khan and pooja hegdeSakal
Updated on

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. सलमान खानच्या आगामी चित्रपटातील 'जी रहे थे हम' या लेटेस्ट रोमँटिक गाण्याचा टीझर सोमवारी रिलीज झाला आहे.

'किसी का भाई किसी की जान'च्या या रोमँटिक गाण्यात बी-टाऊनची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे सलमानसोबत रोमान्स करताना दिसत आहे. यासोबतच भाईजानच्या 'जी रहे थे हम' या गाण्याच्या रिलीज डेटचीही माहिती सोशल मीडियावर देण्यात आली आहे.

सोमवारी सलमान खानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटातील 'जी रहे थे हम' या गाण्याचा टीझर रिलीज केला. या टीझरमध्ये सलमान खानचा लांब केसांमधील लूक अप्रतिम दिसत आहे, तर पूजा हेगडे तिच्या सौंदर्याने आणि किलर स्टाईलने चाहत्यांची मने जिंकत आहे.

या टीझरमध्ये फॉल इन लव्ह गाण्याचे बोल तुम्ही स्पष्टपणे ऐकू शकता. त्याचबरोबर 'जी रहे थे हम'च्या या टीझरमध्ये तुम्हाला सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्यातील केमिस्ट्रीही स्पष्टपणे पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे सलमान खानने हे गाणे स्वतःच्या आवाजात गायले आहे.

salman khan and pooja hegde
Jr NTR: RRRला ऑस्कर मिळल्यानंतर ज्युनियर एनटीआर यापुढे चित्रपट साइन करणार नाही?

'जी रहे थे हम' या लेटेस्ट गाण्याच्या टीझरसोबतच सलमान खानने या गाण्याची रिलीज डेटही जाहीर केली आहे. सलमानच्या म्हणण्यानुसार, किसी का भाई किसी का जानचे हे तिसरे गाणे 21 मार्च म्हणजेच बुधवारी रिलीज होणार आहे. याआधी 'किसी का भाई किसी की जान'मधील 'नईयो लगदा' आणि 'बिल्ली बिल्ली' ही गाणी हिट ठरली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()