Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie Review : डोक्याची मंडई अन्‌ जीवघेणा ‘भाईजान’!

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie Poster
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie Posteresakal
Updated on

"जेव्हा कोणाला फारसं माहीत नसायचे, ज्या काळात साउथ चित्रपट फारसे हिंदीत डब होत नसत. त्या काळात बॉलिवूडने साउथ चित्रपटांचे सरळ रांगेत रिमेक बनवून आपले प्रस्थ स्थापित केले. अनेकांचे स्टारडम, करिअर साउथच्या रिमेकने वाचवले.

पण आता काळ बदलला आहे, प्रेक्षकांना सगळ माहीत आहे. एका क्लिकवर यू ट्यूबवर साउथचे काही चित्रपट मोफत असताना, ते पण सगळ्या देशाने बघितले असताना अशा चित्रपटाचे रिमेक बनवून बॉलिवूडने प्रेक्षकांना ‘ये गोला अब रहने लायक नहीं रहा’, म्हणण्याची वेळ आणली आहे.

अजितकुमार स्टारर २०१४ चा रिलीज सुपरहिट ‘वीरम’ चित्रपटाचा रिमेक २०२३ मध्ये बनवलेला ‘किसी का भाई, किसी की जान’ मेंदू, डोळ्यावर केलेल्या एखाद्या अत्याचारापेक्षा कमी नाही.

सलमानच्या फॅन्सला कितपत हा चित्रपट आवडेल, याबाबत जरा शंकाच आहे. अडीच तासांच्या काळात ‘किसी का भाई, किसी की जान’ सलमानभाईच्या लीला बघून ‘आता जीव घेतो का’, म्हटल्यावाचून प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर पडत नाही."

(Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie Review by tushar maghade entertainment nashik news)

स्टोरी

स्पॉयलर्स टाळून स्टोरी विस्कटून सांगायची झाली म्हटल्यास, दिल्लीतील एका वस्तीत भाईजान आपल्या तीन भावांसोबत राहत असतो. चौघेही अविवाहित आहेत. लहानपणी भावांचे पालनपोषण करण्यासाठी भाईने आपलं ‘ब्रेकअप’ केलेले असते आणि ‘वय’ झाल्यावरही आपल्या तरुण ब्रदर्ससोबत सिंगल आयुष्य जगत असतो.

फॅमिली एकसंध ठेवण्यासाठी भावांनाही तो ‘सिंगल लाइफ’ जगण्यासाठी सांगत असतो. पण भावांना लग्न करायचं असतं, त्यांनी आयुष्याच्या जोडीदारही बघून ठेवलेल्या आहेत. आपला मोठा भाऊही सिंगल राहू नये म्हणून त्याला चांगला पार्टनर शोधण्याचा ते प्रयत्न करू लागतात.

त्यातच ‘भाग्या’ची एंट्री होते. दुसरीकडे भाई ज्या वस्तीत राहतो, त्या जागेवर बिल्डरांचा डोळा आहे. यातच ‘भाग्या’ आणि भाईजानची लव्हस्टोरी सुरू होते. भाग्याचा भाऊ ‘अण्णाई’ची कहाणी सुरू होते. अशाप्रकारे कथेतील जांगडगुत्ता वाढत जातो. आता जांगडगुत्ता तुम्हाला सोडवायचा असेल, तर तुम्ही थेट थिएटर गाठू शकता...

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie Poster
Kisi Ka Bhai kisi ki Jaan सिनेमा कुटुंबासोबत पहाल तर बिघडेल पूर्ण महिन्याचं बजेट.. एका तिकीटाची किंमत ऐकाल तर..

ॲक्टिंग

कोणाला झाकावं अन्‌ कोणाला वर काढावं, अशी बोंब अभिनयाच्या बाबतीत सगळ्या भल्यामोठ्या स्टारकास्टने करून ठेवली आहे. त्यातल्या त्यात सतीश कौशिक, व्यंकटेश दुग्गापुत्ती यांनी आपली भूमिका सहजसुंदर वठविली आहे.

हीच काय एवढी सुखावह बाब. जेथे मोठमोठे स्टार माती खातात, तिथे बॉक्सर विजेंदर सिंगकडून काय अपेक्षा करणार. त्याने आपल्या परीने चांगला प्रयत्न केला आहे. सलमानचे भाऊ बनलेले राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल यांनी जरा ‘अतिच’ ॲक्टिंग केली आहे.

मुख्य नायिका पूजा हेगडे, शहनाज गिल असून, ते नसल्यासारखे आहेत. चित्रपटाचा मुख्य हिरो सलमानभाईचा आख्खा चित्रपटात चेहऱ्यावर इस्त्री करून वावर आहे. एक-दोन हसण्याचे, इमोशनल सीन वाटेला आलेले असतानाही सलमानभाईच्या चेहऱ्यावरची इस्त्री जराशीही उतरलेली नाही.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie Poster
Twitter Review: कसा वाटला मग पब्लिकला भाईजानचा kisi ka bhai kisi ki jaan... ट्विटर रिव्ह्यू म्हणताय, 'सिनेमा खुपच...'

म्युझिक, ॲक्शन, कॅमेरा

चित्रपटाची कथा जशी आउटडेडेड आहे, तेच अगदी संगीताच्या बाबतीतही आहे. चित्रपट बघताना, फॉरवर्ड करण्याचे ऑप्शन असतं तर किती बरे झालं असते, अगदी हीच फिलिंग गाणे बघताना येते. स्लो मोशनमधल्या हाणामाऱ्या, फिजिक्सची वाट लावत केल्या जाणाऱ्या करामती हे आता प्रेक्षकांना नवीन राहिलेले नाही.

या करामती येथेही आहेत आणि त्या बऱ्यापैकी बघण्यालायक आहेत. तरी काही ॲक्शन सीनमध्ये नजरेतून तांत्रिक चुका सुटत नाही. बाकी कॅमेरा, तांत्रिक बाजू ठीकठाक आहेत. याच गोष्टी जरा अडीच तासांचा अत्याचार सुसह्य करतात.

बाकी घिसीपिटी कथेचा शिरखुर्मा दिग्दर्शक फरहाद सामजी यांनी २०२३ मध्ये प्रेक्षकांना खाऊ घालून काय मिळवले, हे भाईजानच जाणो.

सारांश

सलमान खानचे चित्रपट म्हटले, की कथा, लॉजिक सगळं घरीच सोडून यायचं असतं. तसे सलमानच्या फॅन लोकांना याचं काही घेणेदेणे नसतं. सलमानला मोठ्या पडद्यावर बघणे हीच त्यांच्यासमोर मोठी ट्रीट असते.

कथा, लॉजिक, ॲक्टिंग या गोष्टींना हूंगत कोण, सलमानने शर्ट काढला, की पैसे वसूल, म्हणणारे सलमान खानचे फॅन एखाद्या राजकारणात उलथापालथ करणाऱ्या ‘व्होट बँक’पेक्षा कमी नाहीत.

याच फॅनच्या जिवावर कसलेही चित्रपट देऊन सलमानच ‘स्टारडम’ अढळ आहे, तर ‘किसी का भाई, किसी का जान’मधून सलमानने दुनिया गेली तेल लावत, असं म्हणत चाहत्यांना खूश करण्याचा ‘दिलो जान से’ प्रयत्न केला आहे. आता हा प्रयत्न चाहत्यांना किती आवडतो, याबद्दलही डाउट आहेच.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie Poster
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: लहान मुलांच्या गाण्यांना तर सोड रे ! योयोसोबत भाईजानचा नर्सरी सॉन्गवर लुंगी डान्स..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.