Filmy आहे KK ची 'लव्ह स्टोरी', असं मिळवलं होतं बालपणीचं प्रेम...

प्रसिद्ध गायक KK हा हृद्यविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यूमुखी पडला अनं जगभरातील त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली.
Singer KK's Beautiful Love Story
Singer KK's Beautiful Love StoryGoogle
Updated on

बॉलीवूडचा(Bollywood) प्रसिद्ध गायक(Famous Singer) KK हा हृद्यविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यूमुखी पडला अनं जगभरातील त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली. वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी त्याचं जग सोडून जाणं जीवाला चटका लावून गेलं. मंगळवारी ३१ मे रोजी,एका लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान केके ला हृद्यविकाराचा झटका आला. मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अटॅक आल्यानंतर केकेला थेट हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं. पण तिथे पोहोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आलं. केके च्या मागे त्याची पत्नी ज्योती लक्ष्मी कृष्णा(Wife Jyothy Laxmi Krishna) आणि दोन मुलं असा परिवार आहे. केके च्या निधनानंतर लोक त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टींना उजाळा देत आहेत. लोक त्याच्या मुलाखतींचे व्हिडीओ शोधू लागलेयत,जे त्याच्या करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्यावरही प्रकाशझोत टाकत आहेत.

Singer KK's Beautiful Love Story
'व्हॉईस ऑफ लव्ह' केके चं निधन; सुन्न झालेल्या बॉलीवूडनं व्यक्त केला शोक

एका मुलाखती दरम्यान केके नं खुलासा केला होता की, आपल्या लेडी लव्हशी लग्न करण्यासाठी त्यानं सेल्समनची नोकरी केली होती. १९९१ साली केकेनं आपली लहानपणीची खास मैत्रिण ज्योती लक्ष्मी कृष्णा सोबत लग्न केलं होतं. ज्योतीसोबत केके ची पहिली भेट ही इयत्ता ६ वी मध्ये झाली होती. केके नं आपलं वैयक्तिक आयुष्य नेहमीच लाइमलाइट पासून दूर ठेवलं. हेच कारण आहे की लोकांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूप कमी माहित आहे. काही दिवसांपूर्वी केके छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'द कपिल शर्मा शो' च्या सेटवर पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत शान आणि पलाश सेन देखील आले होते. कपिलनं केकेला आपल्या स्टाइलमध्ये बोलतं केल्यावर केकेनं आपल्या लेडी लव्हसोबत लग्न करण्यासाठी सेल्समनची नोकरी केली होती असा खुलासा केला होता.

Singer KK's Beautiful Love Story
1 करोडची ऑफर देऊनही 'KK' ने गायला दिला होता नकार; काय होतं कारण...

याच शो मध्ये केके नं सांगितलं होतं की,सासु-सासरे यांच्या सांगण्यावर त्यानं पहिल्यांदा आपल्यासाठी नोकरी शोधली आणि मगच त्याला ज्योती लक्ष्मी कृष्णा सोबत लग्न करण्याची परवानगी दिली गेली होती. केके नं त्यावेळी या गोष्टीचा देखील उल्लेख केला होता की त्यानं ती नोकरी तीन महिन्यातच सोडली होती. केके चा पहिला म्युझिक अल्बम १९९९ साली आला होता. पण त्यानंतर केके ने मागे वळून पाहिलं नाही. केकेनं गेली अनेक वर्ष आपल्या आवाजाच्या जादूनं लोकांना मंत्रमुग्ध केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.