KL Rahul: जावयाने शतक ठोकलं तर सासरा झाला खुश, सुनिल अन् अथिया शेट्टीने केलं दणक्यात सेलिब्रेशन

के. एल. राहूलने शतक ठोकल्यावर सुनिल - अथियाने केलं कौतुक
kl rahul 100 against pakistan suniel shetty and athiya shetty celebration
kl rahul 100 against pakistan suniel shetty and athiya shetty celebration SAKAL
Updated on

काल भारत vs पाकिस्तानमध्ये मॅच झाली. कोणीही कल्पना केली नव्हती अशी गोष्ट काल घडली. ते म्हणजे के. एल. राहूलने शतक ठोकलं.

गेल्या अनेक महिन्यांपासुन के. एल. राहूल खराब फॉर्म मध्ये आहे, अशी चर्चा सुरु होती. पण काल के. एल. राहूलने पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकून सर्वांची बोलती बंद केली. के. एल. राहूलच्या सेंच्युरीचं सासरे सुनिल शेट्टी आणि पत्नी अथिया शेट्टी यांनी सेलिब्रेशन केलं.

(kl rahul 100 against pakistan suniel shetty and athiya shetty celebration)

kl rahul 100 against pakistan suniel shetty and athiya shetty celebration
Welcome 3: अक्षय कुमारच्या आगामी वेलकम 3 चं शुटींग थांबलं, पैशांच्या कारणावरुन मोठा वाद

अथिया शेट्टीने पती आणि क्रिकेटर केएल राहुलवर आपले शतक पूर्ण करताना एक पोस्ट लिहिली, "काळी रात्रही संपेल आणि सूर्य उगवेल.. तु माझं सर्वस्व आहेस. मी तुझ्यावर प्रेम करते."

त्याचवेळी सासरे सुनील शेट्टी आपल्या भावना व्यक्त केल्या. "एक उदात्त कामगिरी - विजयी परतावा. कृतज्ञता ओव्हरफ्लो. सर्व प्रयत्नांना सक्षम बनवल्याबद्दल सर्वशक्तिमान देवाचे आभार."

इतकंच नाही तर बॉलिवूडच्या तमाम स्टार्सनी राहुलच्या विजयावर आपल्या भावना व्यक्त केल्या.

टीव्ही स्क्रीनवरील फोटोसोबतच त्याने शतकाचा व्हिडिओही शेअर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना आयुष्मान खुरानाने लिहिले, 'किती अप्रतिम पुनरागमन झाले.'

अनिल कपूरने भरपूर टाळ्या वाजवल्या, तर टायगर श्रॉफनेही चिअर अप केले आणि लाल हार्ट इमोजीसह यय लिहिले.

केएल राहुलने बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीशी लग्न केले होते. पण अनेकदा दोघांच्या करिअरबद्दल बरंच काही बोललं जातं. गेल्या काही महिन्यांपासुन केएल राहुल एकही धाव न काढता बाद झाला आहे. त्यामुळे त्याला लोकांच्या टिकेला सामोरे जावे लागले. मात्र त्याने काल आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून सर्वांनाच थक्क केले आहे.

लोकेश राहुलने 106 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकार ठोकले आणि 111 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. त्याचबरोबर विराट कोहलीने नाबाद 94 चेंडूत नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 122 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.