Baipan Bhaari Deva: बाईपण भारी देवा आणि राज ठाकरेंचे वडील श्रीकांत ठाकरेंचं खास कनेक्शन, एकदा वाचा

Baipan Bhaari Deva सिनेमा आणि राज ठाकरेंचे वडील श्रीकांत ठाकरेंसोबत सिनेमातं खास कनेक्शन समोर आलंय
Know the special connection between Baipan Bhari Deva and Raj Thackeray's father Shrikant Thackeray
Know the special connection between Baipan Bhari Deva and Raj Thackeray's father Shrikant Thackeray SAKAL
Updated on

Baipan Bhaari Deva News: बाईपण भारी देवा सिनेमा सध्या बॉक्स ऑफीसवर प्रेक्षकांची चांगली गर्दी खेचत आहे. बाईपण भारी देवा सिनेमा सगळ्यांना आवडला.

इतकंच नव्हे तर सिनेमा सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडतो. सिनेमा रिलीज होऊन अनेक आठवडे झाले तरीही हाऊसफुल्ल गर्दी मिळवण्यात सिनेमा यशस्वी झालाय.

आता सिनेमाविषयी एक खास गोष्ट समोर आलीय. ती म्हणजे राज ठाकरेंचे वडील श्रीकांत ठाकरेंसोबत सिनेमातं खास कनेक्शन समोर आलंय. जाणुन घेऊ...

(Know the special connection between Baipan Bhari Deva and Raj Thackeray's father Shrikant Thackeray )

Know the special connection between Baipan Bhari Deva and Raj Thackeray's father Shrikant Thackeray
OMG 2 Story Leak: या गंभीर समस्येसाठी भगवान शंकर अवतरणार, OMG 2 कथा झाली उघड

बाईपण... सिनेमा आणि श्रीकांत ठाकरेंचं कनेक्शन

बाईपण भारी देवा सिनेमा अनेक जणांनी पाहीला असेलच. पण बहुतांश लोकांना सिनेमातील राज ठाकरेंचे वडील श्रीकांत ठाकरेंचं कनेक्शन समजलं नसेल. तर बाईपण भारी देवा चे दिग्दर्शक केदार शिंदेंनीच खुलासा केलाय.

केदार शिंदेंनी सोशल मिडीयावर एक पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये ते लिहीतात.. बाईपण भारी देवा मध्ये खरतर चार गाणी. त्यातलं टायटल व पिंगा हे कोरसची गाणी.

त्याला स्वर देणाऱ्या ज्या ज्या आहेत त्यांना नमस्कार! एक सॅड सॉंग आहे.. स्व. श्रीकांत ठाकरे यांचं गाजलेलं गाणं.. "उघड्या पुन्हा जाहाल्या". नव गाणं करायचं नव्हतं.

कारण ज्या ठिकाणी ते गाणं येतं, नवं गाणं कदाचित तेवढ अपील झालं नसतं. असं मला वाटत. एक nostalgic feel देऊन जात ते गाणं. ते गायलं आहे सुवर्णा राठोड कुलकर्णी यांनी. कमाल गायलंय.

Know the special connection between Baipan Bhari Deva and Raj Thackeray's father Shrikant Thackeray
Johnny Lever: कॉमेडीला उज्वल भविष्य देण्यासाठी जॉनी लिव्हर यांनी लेक जेमीसोबत घेतला महत्वाचा निर्णय

केदार शिंदे पुढे लिहीतात.. आज लोकं विचारतात की, ते गाणं रीलीज कधी करणार? लवकरच.. आणि... शेवटचं गाणं. "मंगळागौर" ज्यासाठी केला होता अट्टाहास!! ती सगळी पारंपरिक गाणी एकत्र collage करून सादर करायची होती. हे खेळ रात्रभर चालतात.

पण सिनेमात ते गाणं ३-४ मिनिटाचं हवं होतं. त्याला स्वर देणारी सावनी रविंद्र कम्माल गायली आहे. त्याची सुरूवातीची आरती ज्या सुकूनने ती गायली आहे, तिथेच प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. तीचा आवाज घरंदाज वाटतो.

सहा जणींसाठी एकच असला तरी थिएटर मध्ये असा काही घुमतो की, त्यावर काही बायका प्रत्यक्ष तर काही मनातल्या मनात फेर धरून नाचतात. या सिनेमा साठी या सगळ्यांचं योगदान खुप मोठं आहे.

तर ही पोस्ट वाचुन कळुन येईल की, बाईपण भारी देवा सिनेमातलं "उघड्या पुन्हा जाहाल्या" हे गाणं राज ठाकरेंचे वडील स्व. श्रीकांत ठाकरे यांनी लिहीलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.