Koffee With Karan : 2 सेलिब्रिटींना करण कधीही शोमध्ये आमंत्रित करणार नाही; कारण...

शोचा नवीन भाग गुरुवारी प्रसारित होणार आहे
Koffee with Karan Latest News
Koffee with Karan Latest NewsKoffee with Karan Latest News
Updated on

Koffee with Karan Latest News करण जोहरचा (Karan Johar) कॉफी विथ करण हा शो खूप लोकप्रिय आहे. हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून सुरू आहे. आजही तो प्रेक्षकांना आवडतो. या शोमध्ये आतापर्यंत अनेक स्टार्स आले आहेत. मात्र, आतापर्यंत असे काही सेलिब्रिटी (Celebrity) आहेत जे अद्याप या शोमध्ये आलेले नाहीत. करण स्वतः अशा काही सेलिब्रिटींना शोमध्ये आमंत्रित करू इच्छित नाही. करणने अलीकडेच सांगितले की कोणते २ सेलिब्रिटी आहेत ज्यांना तो शोमध्ये आमंत्रित करू इच्छित नाही.

कॉफी विथ करण शो ची सुरुवात २००५ मध्ये झाली. हा शो पूर्वी स्टार वर्ल्डवर यायचा. आता ७ वा सीझन येत आहे. हा शो टीव्हीवरून ओटीटीकडे गेला आहे. शो आता डिज्नी प्लस हॉटस्टारवर येत आहे. विक्की कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा​​नुकतेच शोमध्ये दिसले होते. आता शाहीद कपूर आणि कियारा अडवाणी आगामी एपिसोडमध्ये दिसणार आहेत. शोचा नवीन भाग गुरुवारी प्रसारित होणार आहे.

Koffee with Karan Latest News
Munmun Dutta Video : ‘बबिता’चा गोल्डन अवतार; लेटेस्ट व्हिडिओने जिकंले मनं

करण जोहरला (Karan Johar) अद्याप या शोमध्ये असा कोणता सेलिब्रिटी (Celebrity) आहे जो आलेला नाही, असा प्रश्न करण्यात आला. यावर करण म्हणाला, काही वर्षांपूर्वी मला रेखा मॅडमला एकदा शोमध्ये आणायचे होते. परंतु, त्यांनी ते मान्य केले नाही. नंतर मला वाटले की त्यांच्याकडे इतके सुंदर आणि आश्चर्यकारक रहस्य आहे. ते संरक्षित करणे चांगले आहे. त्यानंतर मी त्यांना शोमध्ये आणण्याची योजना सोडून दिली.

यानंतर करणने सांगितले की, तो त्याचा मित्र आणि गुरू आदित्य चोप्रा यालाही शोमध्ये आणू शकला नाही. त्याला आणणेही एक आव्हान आहे. त्यामुळे मी आदित्यला कॉफी विथ करणवर आणू शकेन का? मला वाटते की त्याला विचारण्याइतके धाडस माझ्यात नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()